अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार; वरुड तांडा येथील घटना

author img

By

Published : Sep 27, 2021, 10:24 PM IST

f

नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वरुड तांडाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वरुड तांडा (ता.कळमनुरी) नजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. सुनिता बावगे व प्रभाकर बावगे असे मृत पती-पत्नीची नावे आहेत.

हेही वाचा - VIDEO : आरोग्य विभागाच्या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबरला

वसमत फाटा येथील महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील रहिवासी असलेले प्रभाकर शिवशंकरअप्पा बावगे (वय-५८) व सुनिता प्रभाकर बावगे (वय-५५) हे आपल्या दुचाकीवरून (क्र-एम.एच.३८ टी३६९७) डोंगरकडा येथून हिवरा या गावी परत येत होते. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. त्याच दरम्यान वरुड तांडा येथे अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यात दोघेही पती-पत्नी जागीच ठार झाले. यावेळी वसमत फाटा येथील महामार्ग पोलीस आणि मृत्युंजय दूत यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले.

  • रस्त्याच्या कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले -

राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून सद्यस्थितीत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बरेच जण जखमी झाले तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना एकेरी वाहतूक सुरू असून यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. त्यातच पावसामुळे मोठे खड्डेही पडले आहेत. संबंधित कंत्राटदाराने दोन्ही बाजूकडून रस्ता खोदून ठेवला असून वाहन चालविण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चालू रस्त्याचे खड्डे बुजविणे आणि वाहतूक सुरळीत करणे ही जिमेदारी नेमकी कोणाची? असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित होत आहे.

हेही वाचा - Weather Update : राज्यात मंगळवारी आणि बुधवारी अतिवृष्टी; हवामान विभागाचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.