गुरुवारपासून नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा भाविकांसाठी खुला होणार

author img

By

Published : Oct 5, 2021, 9:52 PM IST

Sachkhand Gurdwara will be open for devotees

कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली प्रार्थनास्थळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७ ऑक्टोबरपासून उघडण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. नांदेडमध्ये जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा येथे देश - विदेशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. गुरुवारपासून सचखंड गुरुद्वारात भाविकांना शासनाचे नियम पाळून प्रवेश देण्यात येणार आहे.

नांदेड - कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली प्रार्थनास्थळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७ ऑक्टोबरपासून उघडण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. नांदेडमध्ये जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा येथे देश - विदेशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. गुरुवारपासून सचखंड गुरुद्वारात भाविकांना शासनाचे नियम पाळून प्रवेश देण्यात येणार आहे.

नांदेड सचखंड गुरुद्वारा

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीच्या धडकेने पाच जण जखमी

गेल्या अनेक महिन्यांपासून गुरुद्वारा बंद

शीख धर्माची दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या नांदेड सचखंड गुरुद्वारा येथे देश - विदेशातील भाविकांची मोठी गर्दी असते. गेल्या अनेक महिन्यांपासून गुरुद्वारात दर्शन बंद होते. भाविक नसल्यामुळे येथील व्यापारही ठप्प होता. येथील व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान गुरुवारपासून भक्तांसाठी गुरुद्वारा परिसर खुला होणार आहे. त्यामुळे, सध्या गुरुद्वारा परिसरात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय

थांबलेला कोरोनाचा प्रसार मधील काळात वाढला होता. त्यामुळे, तो पुन्हा रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे, देशातील प्रार्थनास्थळेही बंद होती. राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यातच मंदिरे, धार्मिक स्थळे उघडावी, अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने ७ ऑक्टोबर घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च गुरुवारपासून उघडण्यात येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या विविध नियम व अटी

शासनाने कोरोना लॉकडाऊन सवलतीत प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी आदेश जारी केले आहेत. सुरक्षित अंतर, मास्क वापरणे, ४० ते ६० सेकंदपर्यंत हात धुणे व सॅनिटायझरचा वापर करणे, यांसह विविध नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. आता बंद असलेली मंदिरे, मस्जिदी, चर्च, विहार, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळांचे दरवाजे गुरुवारपासून भाविकांसाठी खुले होणार आहेत.

लॉकडाऊन काळात उत्तम सेवा

लॉकडाऊन काळात गुरुद्वारा बोर्डाने दररोज लाखो गोरगरीब वस्तीत व अडकून पडलेल्या प्रवाशांना जेवण दिले. तसेच, गुरुद्वारा बोर्डाचे एनआरआय भवन कोविड सेंटर म्हणून सेवा देत आहे. उत्तम स्वच्छता आणि सकस आहार रुग्णांना मिळत असे. एक प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात सर्वात मोठी व चांगली सेवा देऊन गुरुद्वाराने माणूसकीचे नाते जपले.

शासनाच्या नियमांचे पालन करावे - वाधवा

कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून सचखंड गुरुद्वारामध्ये गुरुवारपासून प्रवेश देण्यात येणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार, सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदसिंग वाधवा यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

हेही वाचा - शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपमध्ये; सरकार लवकरच कोसळेल - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.