ETV Bharat / state

महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाण्यासाठी आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक

author img

By

Published : Aug 16, 2021, 7:29 PM IST

Updated : Aug 16, 2021, 10:23 PM IST

नांदेड रेल्वे
नांदेड रेल्वे

कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांना कर्नाटक राज्यात कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे आवश्यक आहे.

नांदेड - महाराष्ट्र तसेच केरळ राज्यातून कर्नाटक राज्यातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्या पूर्वी प्रवाशांनी ७२ तासांच्या आत आरटीपीसीआर अहवाल निगेटीव्ह असणे बंधकारक करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने एका पत्राद्वारे हे कळविले आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

७२ तासाच्या आतील रिपोर्ट असावा

कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांना कर्नाटक राज्यात कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे आवश्यक आहे. ही अट कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना सुद्धा लागू राहील, असे कर्नाटक सरकारने कळविले आहे. अधिक माहिती करता प्रवाशांनी आरआरसीटीसीच्या http://contents.irctc.co.in/en/stateWiseAdvisory.html या संकेत स्थळाला भेट द्यावी, अशी विनंती संबंधित प्रशासनाने केली आहे.

Last Updated :Aug 16, 2021, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.