ETV Bharat / state

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये एक दिवसीय आभासी परिषदेचे आयोजन

author img

By

Published : May 6, 2021, 10:53 PM IST

या परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेमध्ये माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे बीजभाषण करणार आहेत. या परिषदेस विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

रामानंद तीर्थ विद्यापीठ
रामानंद तीर्थ विद्यापीठ

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई येथील मराठी भाषा विश्वकोश निर्मिती ज्ञानमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अब्जांश तंत्रज्ञान ज्ञानमंडळ, ‘संकल्पना कार्य आणि व्याप्ती’ या विषयावर दिनांक ०७ मे रोजी आभासी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.



यांच्या हस्ते होणार उद्घाटन

या परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेमध्ये माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे बीजभाषण करणार आहेत. या परिषदेस विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

यांचे लाभणार मार्गदर्शन

या परिषदेस संसाधन व्यक्ती म्हणून मराठी भाषा विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे हे अब्जांश तंत्रज्ञान ज्ञानमंडळ, संकल्पना कार्य आणि व्याप्ती आणि पुणे येथील डॉ. अनिल लचके सेवानिवृत शास्त्रज्ञ, एनसीएल, हे लेखन नोंदीचा प्रवास व पुणे विद्यापीठातील सेवानिवृत्त माजी अधिष्ठाता डॉ. के.सी. मोहिते यांचे ऊर्जा क्षेत्रातील अब्जांश तंत्रज्ञानाचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

हेही वाचा-भांडुपच्या उत्साही मित्र मंडळाकडून लसीकरण मोहिमेबाबत डोगराळ भागामध्ये जनजागृती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.