ETV Bharat / state

नांदेड-पनवेल-नांदेड या उत्सव विशेष रेल्वेला मुदतवाढ

author img

By

Published : Nov 26, 2020, 7:49 PM IST

festival special train extended Nanded
नांदेड-पनवेल-नांदेड रेल्वेला मुदतवाढ

प्रवाशांच्या सुविधेसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड-पनवेल-नांदेड ही उत्सव विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. आता या रेल्वेला एका महिन्याची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नांदेड - प्रवाशांच्या सुविधेसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड-पनवेल-नांदेड ही उत्सव विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. आता या रेल्वेला एका महिन्याची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रेल्वेमध्ये केवळ ज्या प्रवाशांनी आरक्षण केले आहे, असेच प्रवासी प्रवास करू शकणार आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

या उत्सव विशेष रेल्वेच्या वेळेत बदल

गाडी नंबर 07614 नांदेड ते पनवेल या विशेष गाडीला दिनांक 30 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मात्र रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता ही गाडी 30 नोव्हेंबरपासून नांदेड रेल्वे स्थानकावरून दुपारी 5 वाजून 35 मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पनवेलमध्ये पोहोचेल. तर गाडी नंबर 07613 पनवेल ते नांदेड ही गाडी 1 डिसेंबरपासून बदलेल्या वेळेनुसार धावेल ही रेल्वे पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 4 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी नांदेडला पोहोचेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.