ETV Bharat / state

नांदेडमध्ये पशुधनावर लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

author img

By

Published : Aug 30, 2020, 2:17 PM IST

Lumpy Skin Disease spreding
पशुधनावर लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव

या जंतुचा प्रसार शेळी-मेंढी या प्रवर्गातील जनावरांना शक्यतो जाणवत नाही. शेळी-मेंढीमध्ये या विषाणूचे साधर्म्य आढळून येत असले तरी हा रोग त्यांना होत नाही. या रोगाचा प्रादुर्भाव बैल, गाय, म्हैस या जनावरांमध्ये दिसून येत आहे. देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरांमध्ये या रोगाची तीव्रता जास्त आहे. म्हशींमध्ये त्याचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. लहान व प्रौढ जनावरे या रोगांना अधिक बळी पडत आहेत.

नांदेड - कोरोनासारख्या गंभीर आजारात तग धरुन संकटावर मात करण्यासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा दुसरे संकट कोसळले आहे. लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराने पाळीव जनावरे आजारी पडत असल्याने पशुपालक शेतकरी त्रस्त झाला आहे. जिल्ह्यात या लम्पी स्कीन आजारामुळे मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडू लागली आहेत.

लम्पी स्किन आजारात सुद्धा बाधित पशुधनाचे विलगीकरण करावे लागणार आहे. 'लम्पी स्किन डिसीज' या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील काही भागात सुरू झाला असून हा रोग विषाणूजन्य रोग आहे. त्याचे जंतू जास्त काळ टिकतात. या जंतुचा प्रसार शेळी-मेंढी या प्रवर्गातील जनावरांना शक्यतो जाणवत नाही. शेळी-मेंढी मध्ये या विषाणूचे साधर्म्य आढळून येत असले तरी हा रोग त्यांना होत नाही. या रोगाचा प्रादुर्भाव बैल, गाय, म्हैस या जनावरांमध्ये दिसून येत आहे. देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरांमध्ये या रोगाची तीव्रता जास्त आहे. म्हशींमध्ये त्याचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. लहान व प्रौढ जनावरे या रोगांना अधिक बळी पडत आहेत.

बाधित जनावरांवर अशक्त, दूध उत्पादन घट, जनावरांची भुक मंदावने, अंगावर गाठी येणे आदी लक्षणे आढळून येत आहेत. बाधित जनावराच्या नाकातील स्राव, डोळ्यातील पाणी, तोंडातील लाळ यातून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन त्याचा प्रसार इतर जनावरांना होत आहे. जनावरास प्रादुर्भाव झाल्यास त्याचा गर्भपात अथवा रोगग्रस्त वासरांचा जन्म तर दूध पिणाऱ्या वासरांनाही या आजाराची लागण होण्याची भीती असल्याने पशुपालक धास्तावले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.