ETV Bharat / state

नांदेड रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवस साजरा

author img

By

Published : Jun 10, 2021, 8:37 PM IST

नांदेड रेल्वे विभाग
नांदेड रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवस साजरा

आज दि. १० जून रोजी आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवस पाळला गेेला आहे. या अंतर्गत आज नांदेड रेल्वे विभागात विविध ठिकाणी लेव्हेल क्रॉसिंग गेटवर जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला.

नांदेड - जागतिक पातळीवर दरवर्षी रेल्वे लेव्हेल क्रॉसिंग जागरुकता दिवस साजरा केला जातो. या वर्षी आज दि. १० जून रोजी आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवस पाळला गेला आहे. या अंतर्गत आज नांदेड रेल्वे विभागात विविध ठिकाणी लेव्हेल क्रॉसिंग गेटवर जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला.

१२ मानव संचलित लेव्हल क्रॉसिंग्सचे उच्चाटन
कोविड-१९ साथीचा रोग सर्व देशभर पसरलेला असूनही, नांदेड रेल्वे विभागाने वर्ष २०२०-२१ मध्ये वर्षभरात पुलाखालील भुयारी रस्ता / पुलावरील रस्त्यांची सोय करीत १२ मानव संचलित लेव्हल क्रॉसिंग्सचे उच्चाटन केले आहे. नांदेड विभागीय पातळीवर हे मोठे यश आहे. दक्षिण मध्य रेल्वेने या वर्षी ८१ लेव्हल क्रॉसिंग्सचे उच्चाटन केले आहे.

मानवरहित लेव्हल क्रॉसिंगचे उच्चाटन
दक्षिण मध्य रेल्वेने अत्युच्च दर्जाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित लेव्हल क्रॉसिंगचे उच्चाटन, मानवरहित लेव्हल क्रॉसिंगचे रूपांतर मानव-संचलित क्रॉसिंगमध्ये परिवर्तित करणे आणि पुलाखालील भुयारी रस्ता, पुलावरील रस्ते, मर्यादित उंचीचे भुयारी रस्ते तयार करणे यासारख्या पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. तसेच लेव्हल क्रॉसिंगवरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेचे विविध उपाय केले आहेत. यात नांदेड रेल्वे सुरक्षा विभागाने के. सूर्यनारायणा, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, नांदेड यांच्या नेतृत्वात इंजिनीरिंग विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

अशी केली जागृती

१ . जवळपास ४ लाख रस्ता वापरकर्त्यांना एस.एम.एस. च्या माध्यमातून रेल्वे गेट पार करतांना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

२. रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ असलेल्या गावांमध्ये जावून सुरक्षे संबंधी घोषणा देवून जनजागृती करण्यात आली.

३. विविध रेल्वे गेट वर छापील माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

४. विविध रेल्वे गेट वर पोस्टर लावून जनजागृती केली गेली.

५. रेल्वे गेटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षितपणे कसे कार्य करता येईल याची माहिती दिली.

६. रस्ता वापरकर्त्यांना त्यांची सुरक्षा आणि ट्रेनच्या सुरक्षिततेबद्दल समुपदेशन करून सतर्क करण्यासाठी निवडक व्यस्त लेव्हल क्रॉसिंगवर जनजागृती केली गेली.

नांदेड विभागाकडून विविध माध्यमातून जनजागृती
नांदेड रेल्वे विभागाने जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीच्या उद्घोषणांचा उपयोग करून लेव्हल क्रॉसिंगच्या वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे, सुरक्षित राहण्याचे आणि लेव्हल क्रॉसिंग वापरताना जबाबदार राहण्याचे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.