ETV Bharat / state

नांदेडमध्ये अवैध वाळू उपसा; प्रशासनाने केल्या तीन बोटी नष्ट

author img

By

Published : Jan 7, 2020, 9:35 AM IST

मुदखेड तालुक्यातील वासरी, शंखतीर्थ, महाटी, टाकळी या ठिकाणी गोदावरी नदीच्या तीरावर अवैधरित्या चोरट्या पद्धतीने वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी गेल्या 5 दिवस येत होत्या. अखेर तहसीलदार दिनेश झापले यांनी रविवारी याबाबत धाडसी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

Illegal sand pile in Nanded, 3 boats destroyed by administration
नांदेडमध्ये अवैध वाळू उपसा; प्रशासनाने केल्या तीन बोटी नष्ट

नांदेड - अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी मुदखेड तालुका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. वासरी गावालगत नदीपात्रात सापडलेल्या तीन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. तहसीलदार दिनेश झापले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

नांदेडमध्ये अवैध वाळू उपसा; प्रशासनाने केल्या तीन बोटी नष्ट

मुदखेड तालुक्यातील वासरी, शंखतीर्थ, महाटी, टाकळी या ठिकाणी गोदावरी नदीच्या तीरावर अवैधरित्या चोरट्या पद्धतीने वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी गेल्या 5 दिवस येत होत्या. अखेर तहसीलदार दिनेश झापले यांनी रविवारी याबाबत धाडसी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार संजय नागमवाड, मंडळ अधिकारी लाठकर, पोलीस हेडकॉन्टेबल शिंदे आणि 4 तलाठी यांच्या पथकाने गोदावरी नदीच्या काठी आणि पात्रामध्ये वाळूचा उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेतला. त्यावेळी या पथकाला बासरी गावालगत नदी पात्रात तीन बोटी सापडल्या. यानंतर या सर्व बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - दाट धुके अन् ढगाळ वातावरणाने हरभऱ्याचे नुकसान... शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर!

मुदखेड तालुक्यातील वासरी आणि आजूबाजूला गोदावरी नदीच्या तीरावर मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्याचा वाळू माफियांचा इरादा होता. तसेच रविवारी सुट्टीचा गैरफायदा घेण्याची त्यांची योजना होती. मात्र, तहसीलदारांच्या पथकाने 3 बोटी नष्ट केल्यामुळे वाळू माफियांना सुट्टीचा दिवस महागात पडला असल्याचे बोलले जात आहे.

Intro:अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी प्रशासनाने केल्या नष्ट.....!


नांदेड: वाळूचा अवैध उपसा रोखण्यासाठी मुदखेड तालुका प्रशासनाने धडक कारवाई केली. तहसीलदार दिनेश झापले यांच्या नेतृत्वाखालील पथकाला वासरी गावालगत नदीपात्रात सापडलेल्या तीन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. Body:अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी प्रशासनाने केल्या नष्ट.....!


नांदेड: वाळूचा अवैध उपसा रोखण्यासाठी मुदखेड तालुका प्रशासनाने धडक कारवाई केली. तहसीलदार दिनेश झापले यांच्या नेतृत्वाखालील पथकाला वासरी गावालगत नदीपात्रात सापडलेल्या तीन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत.


मुदखेड तालुक्यातील वासरी, शंखतीर्थ, महाटी, टाकळी या ठिकाणी गोदावरी नदीच्या तीरावर अवैधरीत्या चोरट्या पद्धतीने वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी गेल्या पाच दिवस होत होत्या. अखेर तहसीलदार दिनेश झापले यांनी रविवारी याबाबत धाडसी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार संजय नागमवाड, मंडळ अधिकारी लाठकर, पोहेकॉ शिंदे आणि चार तलाठी यांच्या पथकाने गोदावरी नदीच्या काठी व पात्रामध्ये वाळूचा उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेतला. त्यावेळी या पथकाला बासरी गावालगत नदी पात्रात तीन बोटी सापडल्या. या सर्व बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत . मुदखेड तालुक्यातील वासरी व आजूबाजूला गोदावरी नदीच्या तीरावर रविवारी सुट्टीचा गैरफायदा घेत या भागात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्याचा वाळूमाफियांचा इरादा होता. पण तहसीलदारांच्या पथकाने तीन बोटी नष्ट केल्यामुळे वाळूमाफीयांना रविवार सुट्टीचा दिवस महागात पडला असल्याचे बोलले जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.