ETV Bharat / state

दाट धुके अन् ढगाळ वातावरणाने हरभऱ्याचे नुकसान... शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर!

author img

By

Published : Jan 6, 2020, 9:46 PM IST

नांदेड जिल्ह्यात पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. दाट धुके आणि ढगाळ वातावरणाने हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याने हरभरा पिकावर नांगर फिरवला आहे.

heavy loss of Cicers in Nanded due to dense fog
दाट धुक्यामुळे नांदेडमध्ये हरभरा पिकाचे मोठे नुकसान

नांदेड - जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. दाट धुके आणि ढगाळ वातावरणाने हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पार्डी म. (ता.अर्धापूर) येथील संभाजीराव साबळे या शेतकऱ्याने अक्षरशः हरभरा पिकावर नांगर फिरविला आहे. या शेतकऱ्याचे चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न देणारे पीक मातीत मिसळले आहे.

दाट धुक्यामुळे नांदेडमध्ये हरभरा पिकाचे मोठे नुकसान

हेही वाचा... अक्षम्य दुर्लक्षपणा.. शिवाजी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यात आढळला जिवंत बेडूक

दाट धुक्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. अवकाळी पावसानंतर आता सर्वत्र दाट धुके पसरत आहे. त्यामुळे हरभरा, तूर, गव्हाच्या पिकांवर परिणाम जाणवत आहे. हरभरा पिकावर 'मर' रोगाची लागण झाली आहे. त्यातच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उशिरा पेरलेल्या हरभरा पिकाच्या उगवण्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बीचा हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा... दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर.. 8 फेब्रुवारीला मतदान तर ११ फेब्रुवारीला निकाल

अनेक शेतकऱ्यांनी तर हरभऱ्याचे पीक मोडून काढण्यासाठी सुरुवात केली आहे. अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील शेतकरी संभाजीराव साबळे यांनी यांनी 'डॉलर' जातीचे हरभरा पीक अक्षरशः ट्रॅक्टरने नांगरून टाकले. जिल्ह्यात रब्बीची पेरणी अंतिम टप्यात आली आहे. आजपर्यंत हरभरा एक लाख ७२ हजार हेक्टरवर पेरणी झाला आहे. तर, २४ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची पेरणी २८ हजार हेक्टवर झाली आहे. जिल्ह्यात दोन लाख ३३ हजार आठ हजार हेक्टरनुसार १७१ . ०२ टक्के पेरणी झाली आहे.

हेही वाचा... LIVE : जेएनयू हिंसाचार प्रकरण : हा आरएसएस आणि अभाविपच्या गुंडांचा संघटित हल्ला - आयेशा घोष

चार ते पाच लाखाचे नुकसान...

यंदा पावसाने खरीप हंगाम हातातून हिरावून घेतला. आता त्यापाठोपाठ अवकाळी पाऊस आणि थंडीने रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात धुके पसरले असून रब्बीतील पिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. हरभरा पिकाच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च आला. त्यानंतर पिकाच्या संगोपनासाठी खूप खर्च केला. पण पाऊस, ढगाळ वातावरण व दाट धुके यामुळ मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे नुकसान झाले. सर्व पीक वाया गेल्यामुळेच चार ते पाच एकर हरभरा पीक नांगरून टाकावे लागले. यापासून मोठे उत्पन्न अपेक्षित होते, पण आता चार-पाच लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी संभाजीराव साबळे यांनी दिली.

हेही वाचा... ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीने माझ्यावर टीका केली होती, ते आज कुठे आहेत?

Intro:दाट धुकं अन ढगाळ वातावरणाने....
हरभरा पिकाच नुकसान... शेतकऱ्याने फिरविला नांगर....!

नांदेड: जिल्ह्यात गत पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण शेतकऱ्याचा पिच्छा सोडत नसून रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पार्डी म. (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्याने अक्षरशः हरभरा पिकांवर नांगर फिरविला आहे. सदरील शेतकऱ्याचे चार ते पाच लाख रुपयांचे होणारे उत्पन्न मातीत मिसळले आहे.Body:दाट धुकं अन ढगाळ वातावरणाने....
हरभरा पिकाच नुकसान... शेतकऱ्याने फिरविला नांगर....!

नांदेड: जिल्ह्यात गत पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण शेतकऱ्याचा पिच्छा सोडत नसून रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पार्डी म. (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्याने अक्षरशः हरभरा पिकांवर नांगर फिरविला आहे. सदरील शेतकऱ्याचे चार ते पाच लाख रुपयांचे होणारे उत्पन्न मातीत मिसळले आहे.
दाट धुक्यामुळं जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. अवकाळी पावसानंतर आता सर्वत्र दाट धुके पसरत आहे. त्यामुळे हरभरा, तूर, गव्हाच्या पिकांवर परिणाम जाणवत आहे. हरभरा पिकावर 'मर' रोगाची लागण झाली आहे. त्यातच ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उशिरा पेरलेल्या हरभरा पिकाच्या उगवण शक्तीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामा पाठोपाठ रब्बीचा हंगाम हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी तर हरभऱ्याचे पीक मोडून काढण्यासाठी सुरुवात केली आहे. अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील शेतकरी संभाजीराव साबळे यांनी यांनी डॉलर जातीचे हरभरा पीक अक्षरशः ट्रॅक्टरने नांगरून टाकले.
नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी अंतिम टप्यात आली आहे . आजपर्यंत हरभरा एक लाख ७२ हजार हेक्टरवर पेरणी झाला आहे . तर २४ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे . रब्बी ज्वारीची पेरणी २८ हजार हेक्टवर झाली आहे . जिल्ह्यात दोन लाख ३३ हजार आठ हजार हेक्टरनुसार १७१ . ०२ टक्के पेरणी झाली आहे.

चार ते पाच लाखाचे नुकसान
-----------------------------------
यंदा पावसाने रब्बी हंगाम पावसाने हिरावून घेतला. त्यापाठोपाठ अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यापाठोपाठ आता मोठ्या प्रमाणात धुके पसरले असून रब्बीतील पिकांना मोठा बसत आहे. मला मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी खर्च आला. त्यानंतर पिकाच्या संगोपनासाठी खूप मोठा खर्च केला. पण पाऊस, ढगाळ वातावरण व दाट धुकं यामुळ मोठ्या प्रमाणात हरभऱ्याच नुकसान झालं. सर्व पीक वाया गेल्यामुळेच चार ते पाच एकर हरभरा पीक नांगरून टाकावे लागले. मोठे उत्पन्न अपेक्षित होते पण चार-पाच लाखाचे नुकसान झाले आहे. अशी माहिती शेतकरी संभाजीराव साबळे यांनी दिली.

बाईट-
अनिल साबळे (शेतकरी)
संभाजीराव साबळे (शेतकरी)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.