ETV Bharat / state

विविध लोकांशी भेटून त्यातून काहीतरी शिकण्याची मला आवड - राज्यपाल

author img

By

Published : Aug 5, 2021, 4:14 PM IST

Updated : Aug 5, 2021, 4:41 PM IST

विविध महापुरुष मला प्रभू रामापेक्षा कमी नाहीत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. ते नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठातील कार्यक्रमात बोलत होते.

nanded
nanded

नांदेड - 'राज्याचा सेवक म्हणून काम करताना जास्तीत जास्त ठिकाणी जाणे, लोकांशी भेटणे आणि त्यातून काही शिकणे मला आवडते. सर्वात खालच्या स्तरावर जाऊन तेथील पाहणी करणे आणि त्यातून शिक्षण घेणे ही माझी वृत्ती आहे. विविध महापुरुष मला प्रभू रामापेक्षा कमी नाहीत', असे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. ते नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठातील कार्यक्रमात बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कुलगुरूंकडून राज्यपालांचे स्वागत

आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकाळी नांदेडला आले. पहिला कार्यक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात झाला. विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले.

'नांदेडला येण्याची तीव्र इच्छा'

'लोकांना भेटून काही शिकल्यानंतर ते इतरांना सांगता येते. त्यातूनही आम्हाला काहीतरी मिळत असते. मध्यंतरीच्या काळात कोविड आला आणि त्याने जाणे-येणे बंद केले. त्यानंतरसुध्दा मी खूप वेळेस प्रयत्न केला आणि जेथे जाता येईल तेथे गेलो. कोविड नियमावलींचे पालन करून मी माझ्या इच्छेनुसार राज्याचा सेवक म्हणून काम करत राहिलो. मी राज्याचा सेवक झालो नसलो तरी मला नांदेडला येण्याची इच्छा होतीच. श्री गुरू गोविंदसिंघजींच्या पावलाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन घेणे मला आवश्यक होते', असे कोश्यारी यांनी म्हटले.

'विविध महापुरुष मला प्रभू रामापेक्षा कमी नाहीत'

'श्री गुरू गोविंदसिंघजी, छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आझाद आदी व्यक्ती माझ्यासाठी प्रातस्मरर्णीय आहेत. हे लोक माझ्यासाठी भगवान रामापेक्षा काही कमी नाहीत. त्यामुळेच मी विचार करत होतो की मला नांदेडला गेलेच पाहिजे. दुर्भाग्यवश भारतातील नागरीकांना कोणी आमच्यासाठी काही बलिदान केले आहे याची जाणीव नाही. आज आपण स्वतंत्र जगत आहोत. पण त्या मागील भूमिका माहित नाही. अशा सर्व घटनांना दुर्लक्षीत केले जाते याचे दु:ख आहे', असेही कोश्यारी यांनी म्हटले.

छतावर जाऊन विद्यापिठाची पाहणी

उपस्थित प्राध्यापक मंडळी, व्यवस्थापन समिती सदस्य आणि जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांशी भगतसिंह कोश्यारी यांनी चर्चा केली. यानंतर त्यांच्या हस्ते एका ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्या वृक्षारोपण कार्यक्रमात चलचित्रात राज्यपालांना विद्यापिठाची एक चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी ते म्हणाले, की मी यावर पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहू इच्छीतो. यानंतर समोरच्या इमारतीतील छतावर जाऊन राज्यपालांनी विद्यापीठ परिसराची पाहणी केली. या ठिकाणी नियोजित कार्यक्रमानुसार अल्पसंख्याक मुले आणि मुली यांच्या वस्तीगृहांच्या दोन्ही इमारतींची पाहणी केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे आ. राम पाटील रातोळीकर आणि आ. राजेश पवार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही राजकीय पदाधिकारी भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यक्रमात आले नव्हते.

हेही वाचा - एकमेकांची पाठ खाजवतात, तेच मला जास्त आवडते - अमृता फडणवीस

Last Updated :Aug 5, 2021, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.