ETV Bharat / state

...तर नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागेल - चव्हाण

author img

By

Published : Mar 12, 2021, 6:16 PM IST

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात काही निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र कोरोना नियमांचे पालन न झाल्यास, येणाऱ्या काळात लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचे असल्यास नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात काही निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र कोरोना नियमांचे पालन न झाल्यास, येणाऱ्या काळात लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचे असल्यास नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी माझ्याकडे आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून 200 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेलेली नाही, मात्र काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध हे नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहेत, त्यांचे पालन करावे. कोरोना नियमांचे पालन केल्यास आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.

...तर नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागेल

'आपले कुटुंब, आपली जबाबदारी'

जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांमुळे नागरिकांच्या रोजच्या कामकाजावर विशेष परिणाम होणार नाही. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. दुकानेही सुरू राहणार आहेत. केवळ वेळेचे बंधन घालून गर्दी कमी कण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व निर्बंधांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांचा 'आपले कुटुंब, आपली जबाबदारी' हा संदेश लक्षात ठेवून काळजी घ्यावी, असेही यावेळी अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - नाशकात कोरोनाचा उद्रेक वाढतोय; कठोर निर्बंधासाठी भाग पाडू नका - जिल्हाधिकारी

हेही वाचा - लबाड सरकारची बेबंदशाही; एमपीएससी प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.