ETV Bharat / state

नांदेड विभागातून 33 किसान रेल्वे धावल्या; मालवाहतूकीतून साडेसहा कोटींचे उत्पन्न

author img

By

Published : Feb 3, 2021, 1:06 PM IST

नांदेड किसान रेल्वे मालवाहतूक लेटेस्ट न्यूज
नांदेड किसान रेल्वे मालवाहतूक लेटेस्ट न्यूज

कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगकरिता अडचणीमुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल्वे चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस 5 जानेवारीला नगरसोल येथून सोडण्यात आली.

नांदेड - नांदेड रेल्वे विभागातून जानेवारी महिन्यात 33 किसान रेल्वे धावल्या. यातून रेल्वेला 6.58 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, 13 हजार 658 टन कांद्याची वाहतूक झाली आहे. किसान रेल्वेने मालवाहतूक केल्यास वाहतूक दरात 50% सूट देण्यात येत असून शेतकरी आणि व्यापारी यांना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

५ जानेवारीपासून सुरू आहे किसान रेल्वे

कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगकरिता अडचणीमुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल्वे चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस 5 जानेवारीला नगरसोल येथून सोडण्यात आली.

नांदेड किसान रेल्वे मालवाहतूक लेटेस्ट न्यूज
नांदेड विभागातून 33 किसान रेल्वे धावल्या
किसान रेल्वे मधून 13 हजार 658 टन कांदा वाहतूक

नांदेड रेल्वे विभागातील नगरसोल येथून 31 जानेवारीपर्यंत 33 किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. या 33 किसान रेल्वे मधून 13 हजार 658 टन कांदा पाठविण्यात आला. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, आगरतळा आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - नांदेड: मुख्यमंत्री सडक योजनेतील निकृष्ट दर्जाचे काम गावकऱ्यांनी पाडले बंद


मार्चअखेरपर्यंत 75 रेल्वे सोडण्याचे उद्दिष्ट

आतापर्यंत चालविण्यात आलेल्या 33 किसान रेल्वे मधून नांदेड रेल्वे विभागास 6.58 कोटींचा (सहा कोटी अठावन्न लाख रुपये) महसूल मिळाला आहे. नांदेड विभागातून या वर्षी मार्च महिन्याअखेरपर्यंत आणखी 75 किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ट आहे. दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणी जाण्यासाठी आणखी 105 किसान रेल्वेंची मागणी नोंदविण्यात आली आहे.

50 टक्के आहे सवलत

किसान रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावतात. यामुळे शेती माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने 'ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल'च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50% वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी 50% दर सवलत देण्यात आली आहे.

किसान रेल्वे व्यतिरिक्त मालवाहतूकीतही उत्कृष्ट काम

किसान रेल्वे व्यतिरिक्त नांदेड विभागाने या वर्षी माल वाहतुकीमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. वसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी 12 साखरेचे रेक पाठविले. तसेच आदिलाबाद येथून 5 मक्याचे रेक पाठविले. हिंगोली रेल्वे स्थानकावरून 3 वर्षाच्या अंतरानंतर सरकीचे 3 रेक पाठविण्यात आले. तसेच मालटेकडी –नांदेड येथून गुळाचे 5 रेक पाठविण्यात आले आहेत.

मालवाहतूकीची गती प्रतितास 28 वरून 45 वर

इंजिनीरिंग विभागातील कर्मचारी रेल्वे रुळांच्या देखरेखीसाठी विशेष मेहनत घेत आहेत. मालगाड्यांच्या गतीमध्ये खूप सुधारणा झाली आहे. नांदेड विभागातील मालगाड्यांची गती 28 किलोमीटर प्रतितास होती. यावर्षी ती वाढून 45 किलोमीटर प्रतितास झाली आहे. याचा परिणाम मालवाहतूक वाढण्यावर झाला आहे.

मालवाहतूकीसाठी व्यापारी व शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा- उपिंदर सिंग

नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातून यशस्वीपणे किसान रेल्वे सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला. 'शेतकरी आणि व्यापारी यांनी किसान विशेष रेल्वेसाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच, नांदेड विभागातून मालवाहतूक वाढवण्यात हातभार लावावा,' असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.

हेही वाचा - कौतुकास्पद! नांदेडच्या सामान्य कुटुंबातील कन्येची आसाम रायफलमध्ये निवड..!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.