ETV Bharat / state

Vajramuth Sabha In Nagpur: नागपुरातील वज्रमुठ सभेला न्यायालयाकडून अटी-शर्तींसह परवानगी

author img

By

Published : Apr 14, 2023, 2:26 PM IST

१६ एप्रिल रोजी नागपुरात होणाऱ्या वज्रमूठ सभेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे अखेर सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या मैदानावर वज्रमूठ महासभाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, सभेची जागा खेळाचे मैदान असल्याने भारतीय जनता पक्षासह स्थानिक नागरिकांनी सभा स्थळाला विरोध केला होता. त्यापैकी काहींनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

Vajramuth Sabha In Nagpur
नागपूर बेंच

नागपूर: उपराजधानीत १६ एप्रिलला महाविकास आघाडीकडून नागपुरात वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह परिसरातील स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे नागपुरातील सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या ठिकाणी सभा होणार आहे ती जागा खेळाचे मैदान आहे; त्यामुळे राजकीय सभेसाठी हे मैदान अजिबात देऊ नका, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली होती.


सुधार प्रन्यासकडून मिळाली आहे परवानगी: महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा ही १६ एप्रिलला नागपुरात होणार आहे. याकरिता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थिती दर्शविणार आहेत. या सभेकरिता पूर्व नागपुर येथील दर्शन कॉलनीतील खेळाचे मैदानाची निवड करण्यात आली असून नागपूर सुधार प्रन्यासने मैदानाची परवानगी देखील दिली आहे. असे असले तरीही नागपूर सुधार प्रन्यासने दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे.


अटी शर्तीसह परवानगी: वज्रमूठ सभेला नागपूर पोलिसांनी अटी-शर्ती घालून परवानगी दिली आहे. सभास्थळी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही, महिला सुरक्षा,पार्किंग व्यवस्था यासह अटी घालण्यात आल्या आहेत. सभेला दहा हजार पेक्षा अधिक लोकं आल्यानंतर जर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असल्यास लोकांना इतर थांबवले जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.


राजकीय विरोधात स्थानिकांची उडी: पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दर्शन कॉलनीतील खेळाच्या मैदानावर वज्रमूठ सभा नको, अशी भूमिका घेतली आहे. स्थानिक नागरिकांनी आमदार कृष्णा खोपडे यांना भूमिकेला पाठिंबा देत महाविकास आघाडी विरोधात बंडाचे निशाण फडकवले होते. त्यामुळे आता हा विषय राजकीय सोबतच सामाजिक देखील झाला आहे.


दर्शन कॉलनी मैदानावरच होईल सभा: गेल्या आठवड्यात संभाजीनगरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. त्यामुळेच भाजप कडून विरोधाचे सूर काढले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. मविआने दर्शन कॉलनी मधील मैदान महाविकास आघाडीने निवडले असून त्याच मैदानावर सभा घेतली जाईल, असा पवित्रा काँग्रेससह इतर मित्र पक्षांची घेतला आहे.

हेही वाचा: Sharad Pawar meets Rahul Gandhi : विरोधी पक्षांची पुन्हा वज्रमुठ, शरद पवारांनी राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंची दिल्लीत घेतली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.