ETV Bharat / state

शहरी नक्षलवाद : राज्याच्या मोठ्या शहरांतील झोपडपट्टी भागावर नक्षलवाद्यांची नजर

author img

By

Published : Jun 15, 2022, 12:32 PM IST

Updated : Jun 15, 2022, 6:47 PM IST

जंगलातील नक्षलवाद आता राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये डोकावत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. जंगलात कमकुमत ठरत असलेला नक्षलवाद आता शहराकडे वळला आहे. शहरी नक्षलवाद, अशी त्याला ओळख मिळाली आहे. मोठ्या शहरातील झोपडपट्टी, कुशल अर्धकुशल वर्गावर आपले विचार बिंबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नक्षल विरोधी पथकही तेवढ्याच तत्परतेने शहरी नक्षलवाद मोडीत काढण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पोलीस
पोलीस

नागपूर - निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या आणि हिरवळ संपन्न गडचिरोली जिल्ह्याला लागलेले सर्वात मोठे ग्रहण म्हणजे नक्षलवाद चळवळ. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्हा आज सर्वांगीण विकासाच्या मार्गावर बराच मागे पडला आहे. आता हा नक्षलवाद राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये डोकावू पाहत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. जंगलात कमकुमत ठरत असलेला नक्षलवाद आता शहराकडे वळला आहे. शहरी नक्षलवाद, अशी त्याला ओळख मिळाली आहे. मोठ्या शहरातील झोपडपट्टी, कुशल अर्धकुशल वर्गावर आपले विचार बिंबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नक्षल विरोधी पथकही तेवढ्याच तत्परतेने शहरी नक्षलवाद मोडीत काढण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.

माहिती देताना विशेष पोलीस महानिरीक्षक

2006-2007 मध्ये नक्षलवाद्यांची भविष्यातील रणनीती आणि डावपेच ( Strategy and Tactis ) संदर्भात एक डॉक्युमेंट जारी केले होते. त्यामध्ये जंगलातील लढाई ही ( PLJP) गुरील्ला डावपेच नुसार चालते तर शहरातील रणनीती ही युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून सुरू आहे. युनायटेड फ्रंटमध्ये वेगवेगळ्या मास ऑर्गनायझेशन तयार केलेल्या आहेत. जो क्रांतिकारक वर्ग आहे त्यांच्यावर फोकस करून त्यांना या युद्धात किंवा माओवाद्यांच्या विचारसरणीचा प्रभाव टाकून क्रांती यशस्वी करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये कुशल आणि अर्धकुशल वर्गाचा समावेश केला जातो. याशिवाय झोपडपट्टीत राहणारे सोशीत वर्ग देखील आहे. ज्यांच्या मनात लोकशाही मार्गाने न्याय मिळणार नाही, अशा भावना तयार होतात. तुम्ही त्यामुळे सशस्त्र क्रांतीचे साधन हाती घेतले पाहिजे हे विचार बिंबवण्याचे काम सुरू आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मुंबई, पुणे आणि नागपुरातील झोपडपट्टी भागात त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. अशा फ्रंटल संघटना ज्या महाराष्ट्र भर कार्यरत आहेत त्यांची यादी नक्षत्र विरोधी पथकाकडे उपलब्ध आहे. त्याचे रेग्युलर मॉनिटरिंग सुरू आहे. मात्र, गेल्या तीन चार काही वर्षात नक्षलवाद्यांच्या लक्षात आले आहे की जंगलातील रणनीती फारसी यशस्वी होत नाही त्यामुळे त्यांनी शहरी भागावर फोकस केला असल्याची माहिती नक्षत्र विरोधी पथकाचे संदीप पाटील यांनी दिली आहे.

माओवाद्यांची रणनीती - महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियान विभागाकडून प्रसिद्ध स्टॅटेजी अॅण्ड टॅक्टिस ऑफ इंडियन रिव्हॉल्यूशन या संक्षिप्त पुस्तकात नमूद करण्यात आले आहे की नक्षलवाद्यांना सशस्त्र बळाने राजकीय सत्ता हस्तगत करायची असूनही त्याद्वारेच सर्व प्रश्न सोडवणे हे त्यांच्या क्रांतीचे प्रमुख कार्य आणि सर्वोच्च ध्येय आहे. त्यासाठी सामान्य जनतेला पीपल्स लिब्ररेशन आर्मीमध्ये संघटित करण्यावर त्यांचा जोर आहे.

हेही वाचा - Website Hacked: भारत विरोधी मोहीमेचा भाग, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक

Last Updated :Jun 15, 2022, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.