ETV Bharat / state

गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू

author img

By

Published : Sep 12, 2019, 8:31 AM IST

गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले काका -पुतण्याचा नदीत बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शहाराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील संगम व खरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदीत घडली.

काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू

नागपूर - गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शहाराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील वेणा नदीत घडली. सुरेश शिवराम फिरके (वय ४८) आणि त्यांचा पुतण्या अजिंक्य रमेश फिरके (वय १८) अशी मृतांची नावे आहेत.

गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू

हिंगणा परिसरातील डिगडोह देवी येथील फिरके कुटुंबीय आणि त्यांच्या शेजारचे दोन कुटुंबीय गणेश विसर्जन करण्यासाठी वेणा नदीवर गेले होते. गणेश विसर्जन आटोपून आंघोळ करताना सुरेश फिरके यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडले. ते पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी अजिंक्यसुद्धा खोल पाण्यात गेला. परंतु, दोघेही पाण्याच्या प्रवाहात स्वतःला सांभाळू न शकल्याने वाहत गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशनच्या निरीक्षक सपना क्षीरसागर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दोघांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना बोलावण्यात आले आहे. रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह शोधण्यात यश आले आहे. या घटनेमुळे डिगडोह गावावर शोककळा पसरली आहे.

Intro:नागपूर शहारा जवळ असलेल्या हिंगणा परिसरातील संगम व खरी पन्नासे गावा दरम्यान असलेल्या वेणा नदीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले काका -पुतण्याचा नदीत बुडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे...मृतकांमध्ये सुरेश शिवराम फिरके,वय ४८ आणि त्यांचा 18 वर्षीय पुतण्या अजिंक्य रमेश फिरकेचा समावेश आहे Body:हिंगणा परिसरातील डिगडोह देवी येथील फिरके कुटुंबिय आणि त्यांच्या शेजारचे दोन कुटुंबिय गणेश विसर्जन करण्यासाठी वेणा नदीवर गेले होते...गणेश विसर्जन आटोपून आंघोळ करताना सुरेश फिरले हे खोल पाण्यात गेल्याने ते पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी अजिंक्य सुद्धा खोल पाण्यात गेला परंतु दोघेही पाण्याच्या प्रवाहात स्वतःला सांभाळू शकले नाही व वाहत गेले...घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशनच्या निरीक्षक सपना क्षीरसागर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या....दोघांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले आहे...रात्री उशिरा दोघांचे ही मृतदेह शोधण्यात यश आले असून डिगडोह गावात शोककळा पसरली आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.