Sansad Adarsh Gram Yojana Nagpur : खासदारांनी दिले परंतु ग्रामपंचायतीला सांभाळता नाही आले; नियोजना अभावी पाचगावात पाणी टंचाई

author img

By

Published : May 11, 2022, 3:24 PM IST

Updated : May 11, 2022, 4:12 PM IST

Sansad Adarsh Gram Yojana Nagpur

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी 2014 मध्ये उमरेड तालुक्यातील पाचगाव दत्तक ( Adopted Pachgaon in Umred taluka ) घेतले. गाव दत्तक घेतल्यानंतर कोटीच्या घरात निधी देत सोयी सुविधा उपलब्ध करून दिले. परंतु स्थानिक ग्रामपंचायतच्या नियोजनाच्या अभावामुळे गावात नागरिकांची पाण्यासाठी ( Water scarcity Pachgaon ) भटकंती सुरू आहे.

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांसद आदर्श ग्राम ( Sansad Adarsh Gram Yojana ) योजनेत नागपूरचे खासदार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी 2014 मध्ये उमरेड तालुक्यातील पाचगाव दत्तक ( Adopted Pachgaon in Umred taluka ) घेतले. गाव दत्तक घेतल्यानंतर कोटीच्या घरात निधी देत सोयी सुविधा उपलब्ध करून दिले. परंतु स्थानिक ग्रामपंचायतच्या नियोजनाच्या अभावामुळे गावात नागरिकांची पाण्यासाठी ( Water scarcity Pachgaon ) भटकंती सुरू आहे. गावातली नळ योजना आणि लोडशेडिंगमुळे नियोजन फिसकटेल. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

पाचगावातील पाणी टंचाईवरील विशेष रिपोर्ट



नागपूर पासून २५ किमी अंतरावर पाचगाव आहे. साडे चार हजार लोकवस्तीच पंचक्रोशीत मोठे गाव म्हणून ओळख आहे. देशातील इतर गावात असणाऱ्या समस्या पाचगावातही पाहायला मिळाले. स्थानिक गावातील राजकारण आणि दूरदृष्टी नियोजनाचा अभाव पाणी टंचाईला कारणीभूत ठरले. मुख्य रस्त्यापासून गावाचा दिशेने जाताना जिकडे तिकडे सिमेंट रस्ते झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, वाचनालय, शेतकऱ्यांसाठी ओटे, शेतकरी भवन, वाचनालय, डिजिटल सोय म्हणून वायफाय अशा सोयीसुविधा नजरेत भरतात. पण गावात शिरताच पाण्याची अडचण सांगणारे ते घागरभर पाणी त्या विकासावर पाणी फेरून जात असल्याचे चित्र प्रत्येक घरापुढे असणारे पाण्याचे भांडे बोलून जाते.


अशी आहे खासदार आदर्श ग्राम योजना : 2014 मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी खासदार आदर्श ग्राम योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात एक गाव दत्तक घेऊन त्या गावाला आदर्श गाव बनवावे, अशी अपेक्षा होती. अशा गावात स्वच्छता राखणे, अंगणवाडीत मुलांना प्रवेश देणे, गाव झाडे लावून हरित करणे, आरोग्याच्या संपूर्ण सुविधा या गावात पुरविणे, अशी कामे खासदारांच्या वतीने करणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे गावांचा वाढदिवस साजरा करून गावातील ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सेनानी शहिद कुटुंबियांचा सन्मान करणे, असे विविध कार्यक्रम खासदारांनी राबविणे या योजनेअंतर्गत अपेक्षित आहे.


गावातील पाणी प्रश्न : गावात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केलेले घर असो की मातीचे घर एक चित्र समान होते. ते म्हणजे पाण्याचे भांडे भरलेले ड्रम, नळावर असलेल्या मशीन. गावाच्या शेवटी झोपडपट्टी भागातही तेच चित्र आहे. त्या परिसरात काही घरात नळच नाही, ज्यांचाकडे आहेत तर त्याना 15 ते 20 मिनिट पाणी येत नाही. त्यामुळे एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी कामाचा शोध दुसरीकडे घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातून पाणी भरण्यासाठी विहरिवर रांगा. हे चित्र आहे सांसद आदर्श ग्राम पाचगावचे आहे.



सहा फूट खोलवर नळ योजनेची लाईन : गावात पाईपलाइन आहे. पण ही पाईपलाइन जुनी असून ती सुमारे पाच ते सहाफूट खोलीवर आहे. यातच गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता कुठे उथळ तर कुठे खोलगट भाग आहे. त्यामुळे काही लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहचत नाही. एवढेच काय काहींना घागरभर पाणी मिळत नाही. पाईपलाइन खोलवर असल्याने सर्रास पाण्याच्या मोटारी लावून पाणी भरण्या शिवाय भरतात पर्याय नाही असे सांगतात. तेच गावातील काही वयोवृद्ध महिला मंडळी डोक्यावर घागर घेऊन पाणी भरण्यासाठी कष्ट करताना दिसतात. तेच काही जण पाणी विकत घेऊन आपली तहान भागवत आहे.


दत्तक गावात पाणी नियोजन झाले पण... : गावाला पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेच्या तलावाचा काठावर दोन मोठ्या विहिरी आहे. यात मुबलक पाणी साठाही आहे. यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2014 मध्ये गाव दत्तक घेतले तेव्हा मटकाझरी तलावातून पाण्याची पाईपलाइन गावापर्यंत केली. 2004 मध्ये जीवन प्राधिकरणाचे जल शुद्धीकरणही आहे. पण गावात पाण्याची टाकी लोडशेडिंगमुळे भरत नसल्याचे कारण ग्रामपंचायत सांगत आहे. गावात केवळ 20 मिनिट पाणी मिळत असल्याचा आरोप महिलांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे. काही घरातील नागरिक 500 तर 600 रुपये मोजून टँकरने पाणी विकत घेतात. पण 200 रुपये रोजाने काम करणारे मात्र पाणी विकत घेऊ शकत नसल्याने विहिरीवर जाऊन पाणी भरत असल्याचे पाचगावचे सामाजिक कार्यकर्ता घनश्याम वैद्य यांनी सांगितले.




प्रास्तावित पाईपलाइनसाठी निधी मंजूर टेंडर प्रक्रिया बाकी : यंदा पाणी समस्या वाढली पण लवकरच पाण्याची समस्या सुटणार, असे सरपंच आणि ग्रामसचिव सांगतात. गावात दोन पाण्याच्या टाक्या आहेत. गावाची लोकसंख्या वाढली पण त्या तुलनेत पाण्याचे नियोजन झाले नाही. केंद्रीय मंत्री गडकरींनी पाईपलाइन बदलवून देत होते, तर त्यावेळी ग्रामपंचायतने नकार दिल्याचा आरोप केला. त्यामुळे आज पाणी टंचाई झाली, असे सरपंच उषा ठाकरे यांनी सांगितले. तेच एक मोठी पाण्याची टाकी आणि पाईपलाइनसाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचे काम होणार आहे. पण टेंडर प्रक्रिया बाकी आहे. यातच यंदा गावात लोडशेडिंग आणि तापमान वाढल्याने पाणी मागणी वाढली. त्यामुळे यंदा पाण्यासाठी अडचण झाल्याचे सचिव प्रमोद वऱ्हाडे सांगतात. यावर मात्र माजी उपसरपंच यांनी सध्याच्या ग्रामपंच्यायतचे नियोजन नसल्याने पाणी प्रश्न उद्भवल्याचा सांगतात.

हेही वाचा - Sansad Adarsh Gram Yojana Amravati : खासदार नवनीत राणांच्या जिल्ह्यात खासदार आदर्श ग्राम योजनेचा फज्जा!

Last Updated :May 11, 2022, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.