ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule : निर्दोष सुटल्यासारखे संजय राऊतांनी वागू नये, बावनकुळे यांचा गर्भित इशारा

author img

By

Published : Nov 10, 2022, 5:37 PM IST

Bawankule
Bawankule

संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची केवळ जमानात झाली म्हणून एवढा जल्लोष करण्याची गरज नाही, ते निर्दोष बरे झाले असं समजून वागणं योग्य नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) यांनी राऊतांना टोला लगावला.

नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण ( OBC reservation ) दिलेलं आहे. केवळ 93 नगरपालिकेचा संदर्भात काही तांत्रिक कारणाने समावेश ओबीसी राजकीय आरक्षणमध्ये झाला नाही. निश्चितपणे आज त्या 93 नगरपालिकें संदर्भात ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेल ( OBCs will get political reservation in municipalities ) अशी आशा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) यांनी व्यक्त केली आहे,ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस,राष्ट्रवादीच्या दबावाखाली उद्धव ठाकरे - अफजलखानाच्या कबरी शेजारी असलेल्या अतिक्रमण काढण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ते अतिक्रमण काढायला सांगितलं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली त्यांनी कारवाई केली नाही. शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ अतिक्रमण काढलं त्यासाठी बावनकुळे यांनी सरकारचे अभिनंदन केले आहे.

निर्दोष सुटका झाल्यासारखे संजय राऊत यांनी वागू नये - संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी दिल्लीच्या नेत्यांकडे बोट दाखवले असून आता शांत बसणार नाही असा इशारा दिला. त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे. केवळ जमानत झालेली आहे, जामीन मिळाल्यानंतर भरपूर प्रक्रिया असते, केवळ जमानात झाली म्हणून एवढा जल्लोष करण्याची गरज नाही, निर्दोष बरे झाले असं समजून वागणं योग्य नाही असा टोलाही लगावला.

वन इलेक्शन - केंद्र सरकारने सुद्धा वन नेशन वन इलेक्शन या भूमिकेचं समर्थन केल आहे, पण राज्यातल्या अनेक पक्षांना ते मान्य असावे लागते, शेवटी हा केंद्राचा विषय आहे, पण तरी राज्यातील सगळ्या पक्षांचा एक मत झाला पाहिजे असे दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.