ETV Bharat / state

Narayan Rane News: 'त्या' विधानावरून नारायण राणेंविरोधात संजय राऊत यांचा अब्रू नुकसानीचा खटला

author img

By

Published : Apr 21, 2023, 1:37 PM IST

Union Minister Narayan Rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर अब्रू नुकसानीच्या न्यायालयीन दाव्याचे आव्हान उभे राहिले आहे. खासदार संजय राऊत यांनी मुलुंड न्यायालयात खटला दाखल केला आहे.

मुंबई : राज्यसभेवर संजय राऊत यांना निवडून आणण्यासाठी मी खर्च केला. संजय राऊत यांचे नाव मतदार यादीमध्ये देखील नव्हते, अशा प्रकारचे विधान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नारायण राणे यांनी केले होते. असा आरोप करीत याबाबत संजय राऊत यांनी आता नारायण राणे यांच्यावर वादग्रस्त विधानाबाबत न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा ठोकलेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

पुरावा सादर करावा : संजय राऊत हे राज्यसभेवर जे गेलेले आहे, त्यांच्या पाठीमागे जी ताकद आहे. ती मी लावलेली आहे. निवडणुकीमध्ये मी खर्च केलेला आहे. संजय राऊत यांचे मतदार यादीमध्ये नाव देखील नव्हते. हे सार्वजनिक ठिकाणी विधान वव्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांच्याकडून वकिलालामार्फत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फेब्रुवारी 2023 या काळामध्ये नोटीस बजावली होती. याबाबत नोटिसीमध्ये विचारणा केली होती, की आपण आपल्या विधानाचा पुस्तक पुरावा सादर करावा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला जाईल.


राऊत यांच्याबाबत मानहानी करणारे विधान : दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणी संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस दिली होती. परंतु अद्यापही उत्तर राणे यांच्याकडून आलेले नाही. त्यामुळेच संजय राऊत यांनी आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयात खेचलेले आहे. ज्या रीतीने एका सार्वजनिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याबाबत मानहानी करणारे विधान केलेले आहे. त्याबाबत आता अब्रू नुकसानीचा दावा संजय राऊत यांनी मुंबई न्यायालयात दाखल केला आहे. संजय राऊत यांनी त्यांच्यावर राणे यांनी केलेल्या आरोपाबाबत पुरावा सादर करत नाही. म्हणूनच आता अब्रु नुकसानीच्या दाव्याला सामोरे जा. असे देखील आपल्या याचिकेमध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा : Narayan Rane Hit by Supreme Court : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, अधिश बंगल्यावर हातोडा पाडण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.