ETV Bharat / state

नागपूरमध्ये मित्राचा खून, आरोपी फरार

author img

By

Published : Jun 11, 2020, 10:21 PM IST

Updated : Jun 11, 2020, 10:39 PM IST

गुरूवारी आरोपी, मृत आणि एक व्यक्ती कल्लू तभानेच्या घरी दारू पीत असताना झालेल्या वाद झाला. दारू पिण्याच्या वादातून दोन आरोपींनी कल्लूच्या डोक्यावर हातोडीने वार करत त्याचा खून केला. यामध्ये आरोपी दीपक किसनलाल सोनी आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.

shanti nagar police station, nagpur
शांती नगर पोलीस ठाणे, नागपूर

नागपूर - दारू पिण्याच्या वादातून एकाचा खून झाल्याचे समोर आले आहे. ही घटना शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (गुरूवारी) घडली. कल्लू उर्फ सुरेंद्र तभने असे मृताचे नाव आहे.

नागपूरमध्ये दारू पिण्याच्या वादातून मित्राचा खून, आरोपी फरार

या घटनेची पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की गुरूवारी आरोपी, मृत आणि एक व्यक्ती कल्लू तभानेच्या घरी दारू पीत असताना वाद झाला. दारू पिण्याच्या वादातून दोन आरोपींनी कल्लूच्या डोक्यावर हातोडीने वार करत त्याचा खून केला. यामध्ये आरोपी दीपक किसनलाल सोनी आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. आरोपी दीपक हा बलात्काराच्या आरोपाअंतर्गत कारागृहात बंद होता. नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली होती. ही घटना शांती नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साई नगर हनुमान मंदिर परिसरात ही घटना घडली.

dead kallu tabhane
कल्लू उर्फ सुरेंद्र तभने

आरोपी आणि मृत हे मित्र असल्याचे तपासात पुढे आले आहे. हत्येमागचे प्राथमिक कारण दारू पिण्याच्या वाद असावा, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, दोन्ही आरोपींना अटक आल्यानंतरच नेमके कारण पुढे येणार आहे. शांती नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. तर पुढील तपास सुरू आहे. यामुळे शहरात खुनाचे सत्र अजूनही थांबलेले नसल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Last Updated : Jun 11, 2020, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.