ETV Bharat / state

NCP Crisis : आम्ही शरद पवार यांच्यासोबतच राहणार, नागपूर शहर राष्ट्रवादीचा प्रस्ताव

author img

By

Published : Jul 4, 2023, 5:53 PM IST

NCP Parity Worker
बैठकीसाठी नागपुरातून कार्यकर्ते रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहर कार्यकारणीने शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. नागपूरच्या गणेशपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार गटासोबत न जाता शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र, महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी सावरकर यांनी कोणासोबत राहायचे याबाबत कुटुंबीयांशी सल्लामसलत करून निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगितले.

माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष

नागपूर : राज्यातील राजकारणात मोठा भूकंप रविवारी झाला. वर्षभरानंतर झालेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. त्यांनी आपला वेगळा गट तयार करत राज्यातील सत्तेत वाटा मिळवला आहे. आज नागपूरच्या गणेशपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात एक बैठक पार पडली. याबैठकीला राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उद्या शरद पवार यांनी मुंबई बोलावलेल्या बैठकीसाठी नागपुरातून आज कार्यकर्ते रवाना होणार असल्याची माहिती, शहराध्यक्ष पेठे यांनी यावेळी दिली.



बैठकीत पुढील प्रस्ताव एकमताने पारित : पक्ष दोन भागात विभागल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. अशावेळी पक्ष अडचणीत असल्यावर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात ही सभा पूर्णपणे विश्वास व्यक्त करते. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार नागपूर शहर कार्यकारणी यापुढेही कार्य करत राहील.



कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा : राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी कुणासोबत जायचे असा प्रस्ताव मांडला. त्यावर सर्वांनी एकमताने अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.



राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईला रवाना : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या पक्ष कार्यकर्त्यांची मुंबई येथे बैठक बोलवली आहे. नेत्यांनी जरी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असला तरी, पक्षातील कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत. तरीही उद्याच्या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात मुंबईला कार्यकर्ते रवाना होत आहेत.


फलकाने वेधले लक्ष : आजच्या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालयाबाहेर आम्ही सदैव साहेबांसोबत असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर राष्ट्रवादीची पुढची दिशा काय असले हे आधीच ठरले.



शिवराज गुजर यांची उचल बांगडी : अजित पवार गटात सामील झाल्याने नागपूर जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर यांची उचल बांगडी करून, त्यांच्या जागी राजू राऊत यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी नेमण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कोणाची? खरा प्रतोद कोण? विधानसभा अध्यक्ष म्हणतात...
  2. Maharashtra Political Crisis Update : परवानगी घेऊनच माझा फोटो वापरावा - शरद पवार
  3. Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार; काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विधानभवनात बैठक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.