ETV Bharat / state

Nagpur Rape Case : नागपूर हादरलं; पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणीवर अतिप्रसंग

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 9:38 PM IST

Nagpur Crime News
तरुणीवर अतीप्रसंग

Nagpur Rape Case : नागपुरात एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याची घटना (Nagpur Crime News) उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली.

नागपूर : Nagpur Rape Case : महाविद्यालयातील तरुणीचा पाठलाग करत एका अज्ञात आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना गुरुवारी (5 ऑक्टोबर) उघडकीस आली आहे. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर ही घटना घडली (Nagpur Rape case) आहे. ही घटना ४ ऑक्टोबरला घडली होती. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप केला जात आहे. घटना घडल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तत्परता दाखविल्यानंतर पोलिसांनी सूत्रे हालवली. घटनास्थळी सह पोलीस आयुक्त आश्वती दोरजे यांनी भेट दिल्यानंतर पोलिसांच्या तपासाला गती आली.

तरुणीचा करायाचा पाठलाग : वर्धा येथील एक तरुणी ४ ऑक्टोबर रोजी गावावरून महाविद्यालयाच्या परिसरात उतरली. ती बॅग घेऊन वसतिगृहमध्ये जात होती. यावेळी एका अज्ञात आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. बराच वेळ तो तिच्या मागावर होता.

बहिणीला दिली माहिती, पण अनर्थ घडला : आरोपी पाठलाग करत असल्याने धास्तवलेल्या तरुणीने आपल्या मोठया बहिणीला फोनवरून याबाबतची माहिती दिली. पीडित तरुणीच्या बहिणीने महाविद्यालय प्रशासनाला ही बाब कळवली. मात्र, तोपर्यंत अज्ञात आरोपीने पीडित तरूणीवर अतिप्रसंग केला. बहिणीने फोन केल्यानंतर लगेचचं महाविद्यालयतील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने हिंगणा पोलिसांचे पथकही घटनास्थळी आले होते. या प्रकरणाची तक्रार हिंगणा पोलिसात (Hingna Police Station) करण्यात आली.

एका महाविद्यालयातील तरुणीचा पाठलाग करून, आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला आहे. तर आरोपी हा मजूर वर्गीय असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी स्थानिय गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पाठवण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे - आश्वती दोरजे, सह पोलीस आयुक्त, नागपूर

पोलिसांनी केली टाळाटाळ : हिंगणा पोलिसांनी प्रथमदर्शनी ही छेडछाडीची घटना असल्याने विशेष लक्ष दिले नाही. मात्र, महाविद्यालयाने वैद्यकीय तपासणी केल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, ठाणेदार विशाल काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव यांच्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी करून अज्ञात आरोपी विरुद्ध भांदवी ३७६,३४१,५०६(२),५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. कॉफी शॉपमध्ये प्रेयसीवर बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकर फरार
  2. Little Girl Rape Case : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, नराधमाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी वापरली 'ही' युक्ती
  3. Minor Girl Raped : उज्जैनमध्ये निर्भयासारखं बलात्काराचं प्रकरण, अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.