ETV Bharat / state

Nagpur Crime : बंदूक तलवारसह मोठा शस्त्रसाठा जप्त; घातपाताची तयारी?

author img

By

Published : Jun 24, 2023, 12:02 PM IST

Updated : Jun 24, 2023, 12:30 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

नागपूरच्या कळमना भागात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र (बंदूक) तयार करण्याचा कारखाना आढळून आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रमानंद रघुनाथ धुर्वे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

नागपूर - आरोपीचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून तो नागपुरातील एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. पोलिसांनी त्याच्या घरात लपवून ठेवण्यात आलेला देशी कट्टा, बंदूक, तलवारीसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. शहरातील कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील वैष्णव नगर येथे रमानंद धुर्वे नामक व्यक्तीच्या घरात मोठा शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली असता, 3 देशी कट्टे ,3 तलवारी,1 बंदूक, 13 काडतुस, बारूद, एअर गन आणि छर्रे असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला.

आरोपीच्या संशयास्पद हालचाली - रामानंदचा त्याच्या भावांसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. रामानंदच्या पत्नीने त्याचा भावाची तक्रार पोलिसांत दिली होती. कळमना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, तो स्टेशनमध्ये येत नव्हता. म्हणून जेव्हा पोलीस रामानंदच्या घरी गेले तेव्हा पोलिसांना बघून तो पळून जाऊ लागला, त्याच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं व घराची झडती घेतली त्यात शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला.

जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा - पोलिसांनी आरोपी रमानंद रघुनाथ धुर्वे यांच्या घरातून १ बंदूक (रिवाल्वर), ३ देशी बनावटीचे कट्टे, १३ जिवंत काडतुस,६ रिकामे काडतुस केस,१ एअर गन,३ तलवारी,२चाकू,१ फायटर, १ भाल्याच्या पाता, छोटे गॅस रिफिल, लोखंड गरम करण्याचे सिलेंडर, ४बारुद छोट्या पुड्या, एअर गन आणि छररे, तसेच काही केमिकल जप्त करण्यात आले.

घातपाताची तयारी होती का - आरोपी रमानंद रघुनाथ धुर्वे खाजगी कंपनीत काम करत होता. एका सुपरवायझरने इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कशासाठी जमा केला होता, तो त्यांनी कुठून आणला. कुठल्या घातपाताच्या तयारीत तर नव्हता ना? सगळ्या अनुषंगाने कळमना पोलीस तपास करत आहे. रमानंद धुर्वे यांचा यापूर्वीचा कुठलाही क्राईम रेकॉर्ड नसल्याने चौकशीत काय उघडकीस येणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -

  1. Bomb Blast Threaten To Mumbai : मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकी, आरोपीच्या उत्तर प्रदेशातून आवळल्या मुसक्या
  2. सावत्र आई वडीलांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
  3. Investment Fraud Case: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली सख्ख्या भावांकडून व्यापाऱ्याला २० लाखांचा गंडा
Last Updated :Jun 24, 2023, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.