ETV Bharat / state

...अन् दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

author img

By

Published : Mar 4, 2020, 12:02 PM IST

विमान हायजॅक करत युएस 250 दशलक्ष डॉलर देण्यात यावे, तिहार जेल मधून 4 अतिरेकी सोडण्यात यावे. शिवाय सर्वांना सुखरूप बाहेर जावू द्यावे आणि शेवटची मागणी म्हणजे पतंप्रधान आणि गृहमंत्री यांच्याशी त्याच्या इतर मागण्याच्या पूर्ततेसाठी बोलणी करून द्यावी. यावेळी सुरक्षा यंत्रणांच्या एका पथकाने पाचही दहशतवाद्यांना वाटाघाटीत व्यस्त ठेवले.

विमानतळावरील छायाचित्र
विमानतळावरील छायाचित्र

नागपूर - वेळ सकाळी 11 वाजताची.. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची लगबग.. तेवढ्यात ब्लॅक पँथर एअर लाईनचे जयपूर-चेन्नई विमान (क्र. बी.पी. 3320) पाच दहशतवाद्यांनी हायजॅक केल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळते.. विमानात 109 प्रवासी, 3 लहान मुले, 07 क्रू मेंबर असे एकूण 119 व्यक्ती असलेले हे विमान जयपूर येथून अपहरण करून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळात उतरविले जाते. दहशतवाद्यांनी सर्व प्रवाशांना ओलीस धरले अन् त्या प्रवाशांच्या सुटकेसाठी 4 मागण्या सरकार समोर ठेवल्या.

अन् दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

ज्यामध्ये युएस 250 दशलक्ष डॉलर देण्यात यावे, तिहार जेल मधून 4 अतिरेकी सोडण्यात यावे. शिवाय सर्वांना सुखरूप बाहेर जावू द्यावे आणि शेवटची मागणी म्हणजे पतंप्रधान आणि गृहमंत्री यांच्याशी त्याच्या इतर मागण्याच्या पूर्ततेसाठी बोलणी करून द्यावी. यावेळी सुरक्षा यंत्रणांच्या एका पथकाने पाचही दहशतवाद्यांना वाटाघाटीत व्यस्त ठेवले.स त्याच दरम्यान, सी.आय.एस.एफ. व क्यु.आर.टीच्या पथकाने विमानात घुसून सर्व पाचही अपहरणकर्त्यांचा खात्मा केला. त्यानंतर सर्व प्रवाशाना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

एखाद्या चित्रपटाला शोभणारी ही घटना सत्य नसून एक मॉक ड्रिल असल्याचे पुढे आले.. अन् नागपूरच्या विमानतळावरील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास आपली तयारी पूर्ण आहे की नाही, हे तपासण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून नेहमीच अशा प्रकारच्या कवायती केल्या जातात. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अँटी हायजॅक मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक करण्यात आले हा देखील त्याच कवयतीचा एक भाग होता.

हेही वाचा - नागपुरात चार मजली इमारातीवरुन उडी घेत २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.