ETV Bharat / state

Nagpur Crime News: शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवून भाजप आमदारांना गंडा, आरोपीला गुजरातमधून बेड्या

author img

By

Published : May 17, 2023, 7:37 AM IST

Updated : May 17, 2023, 1:58 PM IST

भाजप आमदार फसवणूक
BJP MLAs cheating

जे. पी. नड्डा यांच्या जवळचे असल्याचे सांगून आमदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीने आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखविले होते.

आमदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

नागपूर: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी मोठी घटना समोर आली आहे. जे. पी. नड्डा यांचा सहायक असल्याचा बनाव करून एका आरोपीने थेट भाजपच्या चार आमदारांकडे पैशांची मागणी केली आहे. या तोतया सहायकाने आमदारांकडे मंत्रीपदासाठी पैशाची मागणी केली. नागपूर पोलिसांनी या आरोपीला अहमदाबादमधून अटक केली आहे. आमदार विकास कुंभारे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. नीरजसिंह राठोड असे आरोपीचे नाव आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारला दिलासा दिल्याने सरकार स्थिर आहे. अनेकांना मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. अशातच मंत्रिपदाचे स्वप्न दाखवून आमदारांची फसवणूक करणारा भामटा गजाआड झाला आहे. या आरोपीला नागपूर पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केली आहे. हा आरोपी अहमदाबाद जिल्ह्यातील मोरबी येथील रहिवाशी आहे. त्याने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचा दावा केला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. गुजरातच्या मोरबी येथील नीरज सिंह राठोड याने भाजपच्या सहा आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केले होते. यात नागपूर मध्यचे विकास कुंभारे, कामठीचे टेकचंद सावरकर, हिंगोली चे तानाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे नारायण कुचे तसेच गोवा येथील प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे बाशा चँग यांचा समावेश आहे.

काही आमदारांनी पैसे दिले? महाराष्ट्राच्या चार आमदारांना फोन करण्यासोबतच आरोपीने नागालँडमधील एका आमदाराला आणि दुसऱ्या एका आमदाराला फोन केला होता. आरोपीने मध्य नागपूर मतदारसंघातील भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना फोन करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. आमदार कुंभारे यांनी राठोडला एकही पैसा दिला नाही. परंतु काही आमदारांनी पैसे दिल्याची चर्चा आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२० अन्वये तहसील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांच्या पथकाने आरोपीला मोरबी येथून अटक केली. अधिक तपास सुरू आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मंत्रीपदाचे आमिष दाखवून गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

जे. पी. नड्डा यांचा आवाज काढून फसवणूक- माध्यमातील वृत्तानुसार आमदार टेकचंद सावरकर यांना फेब्रुवारीपासून पैशाची मागणी करण्यात आली होती. पक्षाध्यक्ष किंवा त्यांचे पीए पैसे मागणार नाहीत, असे वाटल्याने त्यांना संशय आला. संशय आल्याने त्यांनी आरोपीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आरोपीने जे. पी नड्डांचा आवाज काढून काही आमदारांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप पोलिसात तक्रार देखील केली नसल्याचेही आमदार सावरकर यांनी सांगितले.



मलाईदार मंत्रिपद मिळेल? विकास कुंभारे यांना सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नीरज सिंह राठोड याचा फोन आला होता. त्याने जे पी नड्डा यांचे सहायक असल्याचे सांगत एका कार्यक्रमासाठी सहकार्य हवे आहे असे म्हटले. त्यानंतर तुमचे नाव मंत्रिपदासाठी सुरू असून तुम्हाला मोठे जबाबदारी देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर त्याने सुरुवातीला एक लाख 66 हजार व नंतर आणखी लागले तर पैसे देण्यासाठी तयार राहा असे सांगितले. त्यानंतर त्याने तीन ते चार वेळा आमदार कुंभारे यांना फोन केला. मात्र राज्यात कधी मंत्रीपदाबाबत विचारणा झाली नाही. अचानक दिल्लीहून तशी विचारणा होते. पैसे मागितले जात असल्याने कुंभारे यांना संशय आला. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारणा केल्या केल्यावर असे काहीच नसल्याचे स्पष्ट झाले.



पैसे तयार ठेवा गुड न्यूज मिळेल- आमदार विकास कुंभारे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्या कानावर हा प्रकार टाकला. त्यानंतर तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नीरज सिंह राठोडला गुजरातमध्ये जाऊन अटक केली. त्याला आज नागपुरात आणण्यात येणार आहे. नीरज राठोडने आमदार कुंभारे व आमदार टेकचंद सावरकर या दोन नागपूरच्या भाजप आमदारांना फोन करून मंत्रिपदाच्या बदल्यात पक्षनिधी साठी पैसे द्यावे लागतील असे म्हटले. त्याने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी चक्क एक लिंक देखील पाठवली होती. बडोदा येथे संघाच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था केली तर गुड न्यूज मिळेल असे देखील त्याने सांगितले होते.

हेही वाचा

  1. DRDO Pradeep Kurulkar : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो?
  2. Gold Smuggling Case : तस्करीचे सोने 'या' ठिकाणी लपवून चालला होता, डॉक्टरांनी 'ही' क्लुप्ती वापरून काढले सोने
  3. Encroachment Employee Beaten : अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; पाहा व्हिडिओ
Last Updated :May 17, 2023, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.