ETV Bharat / state

Gold Smuggling : विमानतळावर 2.01 कोटींच तस्करींच सोनं जप्त, तस्करीकरिता 'ही' वापरली युक्ती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 5:50 PM IST

Updated : Sep 29, 2023, 9:26 PM IST

Gold Smuggling
Gold Smuggling

नागपूरात 3.497 किलो वजनाचं सोनं जप्त करण्यात कस्टम विभागाला यश आलं आहे. कॉफी मेकर मशिनमध्ये लपवून ठेवलेल्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी कस्टमनं गुन्हा दाखल केला आहे. या सोन्याची किंमत 2.01 कोटी रुपये आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

नागपूर : सीमाशुल्क विभागानं सोनं (गोल्ड) तस्करीच्या आणखी एका प्रकरणाचा भांडाफोड केलाय. ज्यामध्ये दोन कोटी रुपयांचं शुध्द सोनं जप्त करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीनं कॉफी मेकर मशिनमध्ये प्रत्येकी १ हजार ७४८ ग्रॅम वजनाचं सोनं लपवून आणलं. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी सोनं जप्ती असल्याच दावा कस्टम विभागाकडून करण्यात आला आहे.

  • प्रवाशावर संशय : कस्टम विभागानं दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या विमानतळ मोहम्मद अहमद नामक एका प्रवाशावर संशय आल्यानं त्याला थांबवण्यात आलं होतं. तो प्रवासी शारजाहून एअर अरेबिया फ्लाइट क्र G9-415 नं पहाटे 4:10 वाजता नागपूर विमानतळावर आला होता. मोहम्मद अहमदकडं भारतीय पासपोर्ट होता. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.
  • 1 हजार 748 ग्रॅम वजनाचं सोनं सापडलं : आरोपी सोने तस्करीकरणाऱ्या रॉकेटचा भाग असल्याचा संशय सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आला होता. त्याला थांबण्यात आलं, तेव्हा त्याच्या जवळ असलेल्या कॉफी मेकर मशिनची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात 1 हजार 748 ग्रॅम वजनाचं सोनं आढळून आलं. कस्टम अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे.

सोन्याची पेस्ट केली होती जप्त : 19 सप्टेंबर रोजी सोनं तस्करीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला होता. ज्यामध्ये दोन तरुणांनी दुबई येथून स्वतःच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दोन किलो सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचं नागपूर विमानतळावर उघडकीस आलं होतं. कतारवरून आलेल्या विमानानं दोन तरुण नागपूरला आले होते. त्यांच्या हालचालींवर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. दोघांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून पेस्ट स्वरूपात दोन किलोहून अधिक सोन्याची पेस्ट आणल्याचं समोर आलं.

हेही वाचा -

  1. Ujjain Rape Case : उज्जैन बलात्कार प्रकरण; ५ संशयित ऑटो चालक ताब्यात, तपासासाठी 'एसआयटी' स्थापन
  2. Jai Shree Ram : ‘जय श्री राम’ बोलण्यास नकार दिल्यानं तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल
  3. Family Beaten Up In Maval: गणेश विसर्जनादरम्यान घरासमोर डीजे वाजवू नका म्हटल्याने कुटुंबाला मारहाण
Last Updated :Sep 29, 2023, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.