ETV Bharat / state

Marathi Bangla Dictionary Nagpur : साहित्य वाचनाच्या गरजेतून मराठी बांगला शब्दकोशाची निर्मिती; ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

author img

By

Published : Feb 27, 2022, 6:02 PM IST

मराठी भाषा आणि त्यातील साहित्याने अनेकांना भुरळ घातली आहे. ( Marathi Langauge and Literature ) मुळच्या बांगला भाषिक लेखिकेने मराठी साहित्य बांगला भाषेत लिहायला सुरुवात केली. ( Bangla Writer wrote in Marathi ) पण ही सुरुवात एका वेगळ्या पण खास उपक्रमातुन झाली. बांगला भाषा मराठी भाषिक मैत्रिणीना शिकवतांना यातूनच बांगला मराठी असा 24 हजार शब्दाचा शब्दकोश तयार झाला आहे. ( Marathi Bangla Dictionary Nagpur ) हा केवळ शब्दकोश नसून मराठी भाषा ते बांगला असा पूल बांधण्याचे काम उपप्रमातून चार मैत्रिणींनी केला आहे. ( Four Nagpur Womens make Maratha Bangla Dictionary Nagpur )

Four Nagpur Womens make Marathi Bangla Dictionary Nagpur
साहित्य वाचनाच्या गरजेतून मराठी बांगला शब्दकोशाची निर्मिती

नागपूर - मराठी भाषा आणि त्यातील साहित्याने अनेकांना भुरळ घातली आहे. ( Marathi Langauge and Literature ) मुळच्या बांगला भाषिक लेखिकेने मराठी साहित्य बांगला भाषेत लिहायला सुरुवात केली. ( Bangla Writer wrote in Marathi ) पण ही सुरुवात एका वेगळ्या पण खास उपक्रमातुन झाली. बांगला भाषा मराठी भाषिक मैत्रिणीना शिकवतांना यातूनच बांगला मराठी असा 24 हजार शब्दाचा शब्दकोश तयार झाला आहे. ( Marathi Bangla Dictionary Nagpur ) हा केवळ शब्दकोश नसून मराठी भाषा ते बांगला असा पूल बांधण्याचे काम उपप्रमातून चार मैत्रिणींनी केला आहे. ( Four Nagpur Womens make Marathi Bangla Dictionary Nagpur ) केवळ भाषाच नाहींतर संस्कृती आणि साहित्याला समृद्ध करण्याचा प्रयत्न या कामातून दिसून येत आहे. मराठी भाषा गौरव दिनी याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी घेतलेला विशेष आढावा. ( ETV Bharat Special Report on Marathi Bangla Dictionary )

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने याबाबत घेतलेला आढावा

मंदिरा गांगुली जवळपास 42 वर्षांपूर्वी विवाहानंतर महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात आल्यात आणि बांगला ते मराठी भाषा शिकण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला बांगला भाषा अवगत असतांना आजूबाजूला मराठी भाषा शिकताना अनेक मराठी भाषिक मैत्रिणींची साथ लाभली. यातून त्यांचात लेखिका घडत गेली. याच दरम्यान नागपुरात स्थायिक झाल्यानंतर अखिल भारतीय बांगला भाषा साहित्य संघाच्या माध्यमातून बांगला भाषेचा प्रचार प्रसाराचे काम त्यांनी सुरू केले. मराठी भाषिक महिलांना बांगला भाषेतील साहित्य वाचता यावे म्हणून बांगला भाषा शिकायला सुरुवात केली. याच दरम्यान त्यांच्या मैत्रिणी असलेल्या प्रमोदनी तापस यांनी गंमतीने मंदिरा यांना शब्दकोश बनवा, असे सहज म्हटले. यातून शब्दकोश निर्मितीची ठिणगी पडली. या शब्दकोश निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली.

marathi bangla dictionary
मराठी बांगला शब्दकोश

आठ वर्षांच्या अथक परिश्रमातून या शब्दकोशाची निर्मिती -

यात जवळपास आठ वर्षाचाकाळ शब्दकोश तयार होण्यास लागले. हा शब्दकोश तयार करतांना केवळ शब्दच नाही तर संस्कृती, खानपान, खेळ साहित्य अशा बराच गोष्टींचा उल्लेख करत या सर्व बाबींचा समावेश यामध्ये झाला. हा शब्दकोश मराठी बांगला भाषेत असताना सर्वांना सहज समजावा यासाठी बांगला भाषेतील उच्चार हे देवनागरी मध्ये लिहिण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषिक असो की बांगला भाषिक दोघानाही या शब्दकोश सहज समजून भाषा शिकता येईल अशी याची निर्मिती आहे. यात मराठी बाराखडी सुद्धा बांगला भाषेत सुंदर पध्दतीने मांडण्यात आल्याचे प्रमोदनी तापस यांनी सांगितले. तसेच यात मराठी भाषा आणि बांगला भाषा यातील व्याकरणाचा भागावरही काम करण्यात आले आहे. भाषा आणी त्यातील उच्चार कसे करावे, याची यात मांडणी करण्यात आल्याचे डॉ. वीणा गानु सांगितले. तसेच यात अनेक मराठी शब्द त्याचा अर्थासह जशेच्या तसेच बांगला भाषेत असल्याचेही मीनल जोशी यांनी सांगितले.

marathi bangla dictionary
मराठी बांगला शब्दकोश

हेही वाचा - मोदी सरकार लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार - भाजप नेते आशिष शेलार

मराठी साहित्य बंगला भाषेत लिहायला सुरुवात -

मंदिरा गांगुली यांनी मराठी भाषा समजून घेत मराठी साहित्य हे बांगला भाषेत लिहायला सुरुवात केली. यात छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्य त्यांनी बांगला भाषेत लिहत आहे. बांगला भाषेतील साहित्या प्रमाणे मराठी भाषेतही समृद्ध आणि प्रचुर प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. मात्र, हे केवळ मराठीत उपलब्ध असल्याने इतर भाषिकांना ते वाचता येऊ शकत नाही. यासाठी हे साहित्य सर्वत्र वाचले जावे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. सगळे प्रयत्न होत असताना कुठेतरी प्रकाशक समोर येत नसल्याने मराठी भाषेतील साहित्याला दारे उघडे होऊ शकले नाहीत. मात्र, एकदा का प्रकाशक समोर येऊ लागले तर मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतील साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित होऊन ते प्रसारित होईल आणि मराठी भाषेतील साहित्य घरोघरी पोहचेल, अशी आशा आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मंदिरा गांगुली यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.