ETV Bharat / state

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

author img

By

Published : Jun 25, 2021, 10:32 PM IST

सुबोध मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल
सुबोध मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारसा जनाधार नाही. पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माजी मंत्री सुबोध मोहिते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश मिळाला आहे. येत्या काळात नागपूरसह विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षबांधणी करण्याची मोठी जबाबदारी त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

नागपूर - गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्यानंतर सुबोध मोहिते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. सुबोध मोहिते यांनी सर्वात आधी शिवसेनेच्या तिकिटावर रामटेक लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज (शुक्रवारी) त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची घड्याळ बांधत समर्थकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारसा जनाधार नाही. पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माजी मंत्री सुबोध मोहिते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश मिळाला आहे. येत्या काळात नागपूरसह विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षबांधणी करण्याची मोठी जबाबदारी त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

सुबोध मोहिते यांचा राजकीय प्रवास -

सुबोध मोहिते यांनी सुरुवातीला राजकारणात येण्यापूर्वी भाजपा नेते महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहायक म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी थेट राजकारणात उडी घेतली आणि शिवसेनेच्या तिकिटावर रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि खासदार झाले. सुबोध मोहिते रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तब्बल दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्याच दरम्यान सुबोध मोहिते अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्री झाले होते. त्यानंतर शिवसेनेशी काडीमोड घेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसकडून त्यांनी रामटेक लोकसभा निवडणुक लढवली मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांचे मन रमले नाही. म्हणून २०१७ मध्ये मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला. त्यानंतर मात्र सुबोध मोहिते सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिले. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नवी राजकीय इनिंग सुरू झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.