ETV Bharat / state

Dhammachakra Pravartan Din 2023 : का साजरा केला जातो 'धम्मचक्र प्रवर्तन दिन'; काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 8:01 AM IST

Updated : Oct 14, 2023, 2:26 PM IST

Dhammachakra Pravartan Din 2023
६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन

Dhammachakra Pravartan Din 2023 : ६७ वा 'धम्मचक्र परिवर्तन दिना'च्या निमित्तानं आज दीक्षाभूमीवर सकाळपासून लाखो भीम अनुयायांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. 'धम्मचक्र प्रवर्तन दिना'च्या निमित्तानं दीक्षाभूमीवर सकाळी सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचं वाचन करण्यात आलं.

६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन

नागपूर Dhammachakra Pravartan Din 2023 : 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' हा भारतात साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे. या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी नागपूरला येतात. या दिवसाची पार्श्वभूमी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणून साजरा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच दीक्षाभूमीवर लाखो भीम अनुयायांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. तसंच या निमित्तानं दीक्षाभूमीवर सामूहिक बुद्ध वंदनेसह बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचं वाचन करण्यात आलं. दरम्यान, या निमित्तानं आपण 'धम्मचक्र प्रवर्तन दिना'च्या इतिहासावर प्रकाश टाकू या...

काय आहे इतिहास ? : इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात 'अशोक विजयादशमी' म्हणून साजरा केला जातो. सम्राट अशोकांनी केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचं ठरवलं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या ५ लाख अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळं या पवित्र भूमीचं ‘दीक्षाभूमी’ असं नामकरण करण्यात आलं.



दीक्षाभूमीचा इतिहास : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी बौद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोबर १९५६ ला घेतली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती, ती जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पवित्र झाल्याची आंबेडकरी अनुयायांची भावना आहे. त्यामुळे ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी, अशी मागणी सातत्यानं जोर धरत होती. जनभावनेचा आदर राखत महाराष्ट्र शासनानं दीक्षाभूमीची १४ एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर १९७८ साली स्तूपाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. बांधकाम पूर्ण व्हायला सन २००१ उजाडावं लागलं. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागानं दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलं आहे.

हेही वाचा -

  1. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा होणार; राज्य सरकारचा हिरवा कंदील
  2. Babasaheb Ambedkar Yatra: रेल्वेच्या आयआरसीटीसीची 'बाबासाहेब आंबेडकर यात्रा', आजच बुकिंग करा
  3. Ambedkar Jayanti : अवकाशातील तारा ओळखला जातोय बाबासाहेबांच्या नावाने, पहा कसा पाहायचा हा तारा...
Last Updated :Oct 14, 2023, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.