ETV Bharat / state

सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट

author img

By

Published : Nov 5, 2019, 10:40 PM IST

Updated : Nov 6, 2019, 12:01 AM IST

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथील संघ मुख्यालयात गेले. त्यांनी मोहन भागवतांची भेट घेत सव्वा तास चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.

मुख्यमंत्री सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला

नागपूर - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर येथील संघ मुख्यालयात दाखल झाले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांची जवळपास सव्वा तास चर्चा झाली. सत्ता स्थापनेचा पेच असल्यामुळे यातून बाहेर निघण्यासाठी फडणवीस यांनी भागवत यांचे मार्गदर्शन घेतल्याचे बोलले जात आहे. भेटीनंतर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता ते पुन्हा मुंबईला रवाना झाले.

राज्यात आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये फडणवीस हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असा ठराव करण्यात आला.

मुख्यमंत्री सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला

हेही वाचा - 'सोनिया गांधींशी झालेल्या भेटीत आमचं काहीही ठरलेलं नाही'

बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय गोपनीय पद्धतीने नागपूरच्या संघ मुख्यालयात दाखल झाले. सत्ता स्थापनेचा पेच गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असल्याने संघाने यामध्ये हस्तक्षेप करून नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करावा यासंदर्भात शिवसेनेकडून सरसंघचालक मोहन भागवत यांना विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात गेले.

Last Updated :Nov 6, 2019, 12:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.