ETV Bharat / state

क्राईम कॅपिटल बिबट्याच्या दहशतीने भयभीत, कुत्रा आणि बोक्यात दिसू लागला बिबट्या

author img

By

Published : Jun 4, 2021, 11:16 AM IST

Updated : Jun 4, 2021, 12:15 PM IST

नागपूर येथील गायत्री नगर, आय.टी. पार्क क्षेत्रात आढळलेला वन्यप्राणी हा बिबट्याचं असल्याची खात्री वनविभागाला पटल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्याकरीता वनविभागाने ट्रॅप केजेस ( पिंजरे ) लावण्याचा उपक्रम आज देखील सुरूच आहे. बिबट्याने लांब पल्ला गाठल्या बाबतच्या येणाऱ्या सर्व बातम्यांची वनविभागाने सखोल चौकशी केली असता, सदर सर्व ठिकाणी कुठेही बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट चिन्ह आढळले नाही.

बिबट्याची दहशत
बिबट्याची दहशत

नागपूर- नागपूरकरांमध्ये बिबट्याच्या नावाची दहशत इतकी झाली आहे, की कुत्रा किंवा मांजर दिसला तरी तो बिबट्याचा असल्याचा भास नागरिकांना होऊ लागला आहे. अश्याच काही घटना आज संपूर्ण दिवसभरात नागपूर शहरात घडल्याचे बघायला मिळाल्या. त्यामुळे अखेर वनविभागाला प्रसिद्धी पत्रक काढून या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागेल आहे.

वनविभागाने काढले प्रसिद्धी पत्रक

बिबट्याची दहशत
बिबट्याची दहशत

वनविभागाच्या प्रसिद्ध पत्रकानुसार, नागपूर येथील गायत्री नगर, आय.टी. पार्क क्षेत्रात आढळलेला वन्यप्राणी हा बिबट्याचं असल्याची खात्री वनविभागाला पटल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्याकरीता वनविभागाने ट्रॅप केजेस ( पिंजरे ) लावण्याचा उपक्रम आज देखील सुरूच आहे. बिबट्याने गायत्री नगर येथुन व्हीएनआयटी कॅम्पस तेथून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परीसर, अतिथीगृह, महाराबाग नंतर जुने उच्च न्यायालय असा लांब पल्ला गाठल्या बाबतच्या येणाऱ्या सर्व बातम्यांची वनविभागाने सखोल चौकशी केली असता, सदर सर्व ठिकाणी कुठेही बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट चिन्ह, पगमार्क आढळले नाही. अनेक ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेजदेखील तपासण्यात आले असता, बिबट्या असल्याचे कुठलेही पुरावे आढळले नसल्याचं वनविभागाने सांगितले आहे . मिळालेल्या माहितीनुसार जुने उच्चन्यायालय परीसरात रोड वरून बिबट्याने प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे सेमिनरी हिल्स , हिंगणा व ट्रांन्झीट ट्रिटमेंट सेंटर ( TTC ) चे बचाव पथकाचा तसेच रात्र गस्ती पथकाचा मोठा ताफा बिबट्याचा शोध मोहिमेत लावला. यात देखील कुठेही बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट चिन्ह आढळले नाही.

कुत्रा दिसताच बिबट्याच्या नावाची बोंब

GPO ऑफिस चौक यस बँक समोर बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली असता, वनविभागाने घटनास्थळावर तात्काळ धाव घेतली. व पुन्हा एकदा GPO ऑफिस परीसर,मुख्यमंत्री यांचे सचिवालय परीसर ,आयुक्त कार्यालय परीसर ,नागभवन परीसर पिंजून काढला. परंतु कुठेही बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट चिन्ह, आढळले नाही. तसेच GPO ऑफिस चौकाजवळच राहणारे एका रहिवास्याकडे असलेला सायबेरीयन हस्की प्रजातीच्या कुत्र्याला या क्षेत्रात दररोज सायंकाळी फिरायला नेत असतात. सायबेरीयन हस्की प्रजातीचा कुत्रा हा कुत्र्यांच्या प्रजातीमधील सर्वात मोठा कुत्रा असतो, व तो गोल्डन ब्राऊन रंगाचा दिसतो. वनविभागाच्या तपासात सदर ठिकाणी हाच कुत्रा पाहण्यात आला हे सिध्द झाले आहे.

भिंतीवर होता बोका त्यात दिसला बिबट्या

रात्री सुमारे 8.42 वा.पोलीस कंट्रोल रूम, नागपूर येथून परत GPO चौकाजवळ, धर्मदायुक्त कार्यालयाजवळ दोन घरांमधील कंपाउंड वॉल वर बिबट्या फिरत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली असता तिथे देखील बिबट्या आढळून आला नाही. त्याऐवजी बोका आढळून आला. सदर बाब 100 क्रमांकावर फोन करून कळविणाऱ्या महिलेनी देखील गैरसमज झाल्याचे मान्य केले . सदर संपुर्ण प्रकरणात मागील आठ दिवसात वनविभागाचा बराच मोठा ताफा 24 तास कार्यरत असून अशा प्रकारच्या चुकिच्या माहिती मिळाल्याने कठिण परीश्रम करावे लागले आहेत .तरी शहरात कुठेही वन्यप्राणी बिबट्या याचा वावर असल्याची बातमी मिळतांच बातमी खरी असल्याची पुर्ण खात्री करूनच वनविभागाचे टोल फ्रि क्रमांक 1926 किंवा वन्यप्राणी बचाव दल ( TTC ) कार्यालय 0712-2515306 या क्रमांकावर सुचना देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

हेही वाचा-तिरोड्यात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात एक जण जखमी, तर गोठ्यात शिरून केली शेळीची शिकार

Last Updated : Jun 4, 2021, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.