ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule on Pawar Threat: सौरभ पिंपळकरने शरद पवारांना धमकी दिलीच नाही- बावनकुळे यांचा दावा

author img

By

Published : Jun 10, 2023, 1:58 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणात अमरावती येथील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर या तरुणाचे नाव पुढे आले आहे. सौरभ पिंपळकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावर आज बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule on Pawar Threat
सौरभ पिंपळकरने शरद पवारांना धमकी दिलीच नाही

नागपूर: सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र, त्याने शरद पवार यांना धमकी दिलेली नाही. धमकी ही दुसऱ्या फेसबुक अकाउंटवरून आली आहे. खरे तर अशा गोष्टीचा समर्थन करता येत नाही. परंतु सौरभ पिंपळकर याने शरद पवार यांना धमकी दिल्याचा कुठे उल्लेख नाही असा दावा त्यांनी केला आहे. ज्या फेसबुक अकाउंटवरून धमकी आली आहे, त्याचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे. याला आमचे समर्थन असेल, असे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यापूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांना टार्गेट केले. घाणेरड्या शब्दांचा वापर करून अत्यंत वाईट ट्रोलिंग करण्यात आलं होते. त्यावेळी काय कारवाई झाली असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही याआधी कधीही मीडिया ट्रायल केली नाही. म्हणून अडीच वर्षाचा रेकॉर्ड काढला पाहिजे. यापेक्षाही वाईट लिहिणाऱ्या लोकांना आता कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदार संजय राऊत धमकी प्रकरणी सरकारने कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले.

यापुढे असे घडणार नाही याची दखल घेऊ: ठाण्यात काही स्थानिक प्रश्न आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून विरोधी भूमिकेत आहेत. स्थानिक पातळीवर काही वाद निर्माण झाला आहे. हा महाराष्ट्राचा वाद नाही. परंतु भाजप सेना युती ही घट्ट आहे. तिला कोणी तडा देऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर कल्याणमध्ये वाद झाले आहेत. त्यामध्ये मी स्वतः लक्ष टाकणार आहे. स्वतः रवींद्र चव्हाण यांचेशी बोलणार आहे. यापुढे असे घडू नये यासाठी आम्ही दखल घेणार आहोत

श्रीकांत शिंदेंना अधिक मतांनी निवडून आणू: भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. ज्या ठिकाणी शिंदे यांचे खासदार असतील तिथे भाजप मदत करणार आहे. निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत. ही पूर्ण ताकद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देणार आहेत. जिथे शिवसेनेची सिटिंग सीट आहे, त्यांना कोण हलवू शकणार नाही. श्रीकांत शिंदेंना कोणी हलवणार नाही. मागच्या वेळपेक्षा जास्त मताने त्यांना आम्ही निवडून आणू. कल्याणमध्ये भाजप लढेल की नाही हे ठरवण्याचा अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांचा नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीने प्लान केला होता:- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जर ५० आमदार बाहेर पडले नसते तर त्या आमदारांना पुढच्या निवडणुकीत पाडण्याचा प्लान राष्ट्रवादीने केला होता. जर आता महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असते तर उद्धव ठाकरे यांच्याकडे २४ आमदार शिल्लक राहिले असते. तर राष्ट्रवादीचे १०० आमदार झाले असते. कोणत्याही मंत्र्यांना डच्चू देण्याचा काही विषय नाही. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री काढण्याचा अधिकार भाजपला नाही, कोणाला ठेवायचे कोणाला नाही ठेवायचे हे एकनाथ शिंदे ठरवतील. भाजपमध्ये कोणाला ठेवायचं नाही ठेवायचे हे भाजप ठरवणार आहे. केसीआर यांच्याबद्दल मला काही माहिती नाही. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ते कोणाला डॅमेज करतील, कसे डॅमेज करतील. कोण त्यांना समर्थन देतील या संदर्भात माहिती नाही.

मुख्यमंत्री म्हणजे माणूस नाही का: लोक लंडनला जातात. आठ आठ दिवस पंधरा दिवस आराम करण्यासाठी जात असतात. एकनाथ शिंदे आपल्या परिवारासोबत तीन दिवस गेले तर त्यात वावगे काय आहे. प्रत्येक दिवसाला १८ तास काम करणारे मुख्यमंत्री जर आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेले, हे महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य आहे. तीन दिवसांकरिता मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबासोबत राहू नये का मुख्यमंत्री म्हणजे माणूस नाही का, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला.

हेही वाचा-

  1. Amit Shah in Nanded : अमित शाह यांची आज अशोकराव चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात सभा, भाजप करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
  2. Maharashtra Politics: शिंदे गट- भाजपमध्ये फिसकटले? श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा, जाणून घ्या काय आहे वाद
etv play button
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.