ETV Bharat / state

Abdul Sattar Gairan Land Scam गायरान जमीन वाटप प्रकरणी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्या, अजित पवार यांची मागणी

author img

By

Published : Dec 29, 2022, 5:09 PM IST

Ajit Pawar Demand Minister Abdul Sattar Resign
विरोधी पक्षनेते अजित पवार

महसूल मंत्री असताना अब्दुल सत्तार ( Abdul Sattar Gairan Land Scam ) यांनी वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप केली होती. ही जमीन बेकायदेशीरपणे वाटल्याचा आरोप ( Gairan Land Scam Allegations ) विरोध पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत केला. यावेळी त्यांनी स्थगन प्रस्तावही मांडला होता. मात्र अध्यक्षांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. मात्र चौकशी होऊपर्यंत अब्दुल सत्तार ( Ajit Pawar Demand Minister Abdul Sattar Resign ) यांचा राजिनामा घेण्यात यावा अशी मागणी आज अजित पवार यांनी लाऊन धरली.

नागपूर - कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमीन ( Abdul Sattar Gairan Land Scam ) नियमबाह्य पद्धतीने वाटप केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार ( Gairan Land Scam Allegations ) झाला असून त्यामुळे विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा, चौकशी होईपर्यंत त्यांच्या मंत्री पदाचा राजीनामा ( Ajit Pawar Demand Abdul Sattar Resign ) घ्या अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar Demand Minister Abdul Sattar Resign ) यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभेत केली. मात्र हा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला आहे.

गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप तत्कालिन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar Gairan Land Scam ) यांनी २९ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केली. सातत्याने या घटना घडत आहेत. ज्यावेळी मंत्री पदाची शपथ( Gairan Land Scam Allegations ) घेऊन मंत्री कामाला सुरुवात करतात. मात्र असे असताना या घटना घडणे योग्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.

गायरान जमीन वाटप प्रकरणी गैरव्यवहाराची शक्यता गायरान जमीनीबाबत ( Gairan Land Scam Allegations ) वेगळ्या प्रकारचे आदेश असतानाही या जमीनीचे वाटप करण्यात आले आहे. शांताबाई जाधव यांच्या अर्जावर वाशिम जिल्हाधिकारी यांनी १७ मे २०१८ रोजी दिलेला आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी रद्द केला. जिल्हाधिकारी यांनी वस्तुस्थिती तपासली नाही, असा चुकीचा अभिप्राय ( Ajit Pawar Demand Minister Abdul Sattar Resign ) दिला गेला आहे. एक महिन्याच्या आत पाच एकर जागा नियमित करावी, असे लेखी आदेश दिले आहेत. हे नियमाला धरुन नाही. नियमबाह्य जमीनीचे वाटप झाले आहे, असा आरोप पवार यांनी केला. या प्रकरणात आर्थिक व्यवहार ( Gairan Land Scam Allegations ) झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा थेट आरोपही अजित पवार यांनी केला.

दलालांमार्फत संधान साधून जमीन वाटपाची कारवाई अशी प्रकरणे सातत्याने समोर येत असून या सर्वप्रकरणी महसूल राज्यमंत्र्यांनी दलालांमार्फत ( Abdul Sattar Gairan Land Scam ) संधान साधून जमीन वाटपाची कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकरणातील कागदपत्रे ( Ajit Pawar Demand Minister Abdul Sattar Resign ) माझ्याकडे आहेत, असा दावाही पवार यांनी केला. या जमीनी प्रकरणी वेगवेगळ्या ऑर्डर निघाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशी होईपर्यंत सबंधित मंत्र्यांनी राजीनामा ( Gairan Land Scam Allegations ) द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.