ETV Bharat / state

Aaditya Thackeray : वाढत्या रुग्ण मृत्यू प्रकरणावर आम्हला राजकारण करायचं नाही, पण...- आदित्य ठाकरे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 10:23 PM IST

Aaditya Thackeray: राज्यात मागील आठवड्यात ज्या घटना घडल्या. त्यानंतर आरोग्य क्षेत्रात काय बदल होऊ शकतात? यावर चर्चा करण्यासाठी आलो आहे. राजकारण करण्यासाठी आलो नाही. पण नांदेडच्या घटनेबाबत डॉक्टर्सना दोष देउन चालणार नाही. संबधित खात्याने या घटनेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे; असं सांगत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सरकारवर अप्रतक्ष टीका केली आहे.

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे

माहिती देताना आदित्य ठाकरे

नागपूर : Aaditya Thackeray : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नागपूर येथील मेडिकल कॉलेजला भेट देत आरोग्य व्यवस्थाची माहिती जाणून घेतली. त्यांनी आज राज्यातील तीन वेगवेगळ्या शहरात भेटी दिल्या. काही शहरात औषध आणि वाढत्या मृत्यूची चर्चा झाली. मात्र, यावर मला राजकारण न करता मार्ग काढणं महत्वाचं आहे. याच यंत्रणेच्या कामाचं कोव्हिडं काळात कौतुक झालं मात्र, सध्या कुठे आणि काय चुकत आहे याची माहिती घ्यायला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) व खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) उपस्थित होते.



आरोग्य व्यवस्था कमी पडत आहे : राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आजही अनेक पद रिक्त आहेत. याकडे सरकार कधी लक्ष देईल (Aditya Thackeray Criticizes State Government) असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईत देखील आवश्यक औषधांची कमतरता आहे. पावसाळ्यात दरम्यान अनेक आजार डोकं वर काढतात, त्यावेळी बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्ण येतात. त्यांना आरोग्य सेवा दिली जाती मात्र, त्याला सरकारची मदत मिळाली पाहिजे. ही व्यवस्था करण्यात आरोग्य खात कमी पडत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आम्ही या विषयावर आंदोलन करू शकलो असतो पण आम्ही तर नेमकी परिस्थिती जाणून घेत आहोत. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मागणीच्या तुलनेत औषध पुरवठा होत नाही. सरकारने किमान हा बेसिक सपोर्ट रुग्णालयांना दिला पाहिजे.


डिनचे अधिकार वाढवले पाहिजे : हाफकिन कडून औषध पुरवठा होत नाही. याची चौकशी होणार मात्र, पुढे काय हे महत्त्वाचं आहे. यावर उत्तर कोण देईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. रुग्णालयात अधिष्ठातांना जास्तीचे अधिकार देण्याची गरज आहे. त्यांना औषध खरेदीची परवानगी दिली पाहिजे. स्वच्छतागृह स्वच्छ करणे हे डिनचे काम नाही. त्या ठिकाणी इतर यंत्रणा काम करते की नाही, त्यावर लक्ष ठेण्यासाठी जबाबदाऱ्या वाटून द्यायला पाहिजे. औषध खरेदी ही वेळेत व्हायलाच पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.



मेडिकल कॉलेज काढा, पण पद भरती करा : आमदार विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहे, मग औषध घ्यायला का नाही. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढणार मात्र, डिन सारख्या एकाच व्यक्तीवर दबाव पडतो म्हणून पद भरती झाली पाहिजे. तसेच आज पाच राज्याच्या निवडणुका लागल्या पण महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूरची निवडणूक अद्याप लागलेली नाही. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

हेही वाचा -

  1. Aditya Thackeray On Hospital : आरोग्य यंत्रणांची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते सरसावले, मात्र पुढे काय?...आदित्य ठाकरे
  2. Medical And Mayo Death Case : मेडिकल-मेयो मृत्यू प्रकरण; माजी मंत्री नितीन राऊतांनी केली पाहणी तर मनसेने डीनला धरलं धारेवर...
  3. Nagpur Hospital Death Case : नागपूरमध्ये मृत्यूचं तांडव सुरुच? डॉ गजभियेंचा मोठा खुलासा; म्हणाले...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.