ETV Bharat / state

Omicron in Mumbai : मुंबईत ओमाक्रॉनचा सामुहिक संसर्ग; परदेश प्रवास न करताही १४१ जणांना लागण

author img

By

Published : Dec 31, 2021, 3:33 AM IST

Updated : Dec 31, 2021, 3:39 AM IST

omicron in mumbai
ओमायक्रॉन मुंबई

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण देशात आढळून आल्यावर मुंबईत आलेल्या परदेशी प्रवाशांना क्वॉरंटाईन करून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जे प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात येऊ लागल्या. यामधून ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे की नाही, याची माहिती समोर येऊ लागली. ( Omicron in Mumbai )

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा प्रसार झाला आहे. परदेश प्रवास केलेले तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग होत असल्याचे आतापर्यंत समोर आले होते. मात्र, कोणताही परदेश प्रवास केला नसला तरी १४१ मुंबईकरांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून समोर आले आहे. ( People Found Omicron Poisitive Without International Travel History ) यामुळे मुंबईत ओमाक्रॉनचा सामुहिक संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ( Omicron In Mumbai )

१४१ मुंबईकरांना ओमायक्रॉन, परदेशी प्रवाशांच्या चाचण्या -

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण देशात आढळून आल्यावर मुंबईत आलेल्या परदेशी प्रवाशांना क्वॉरंटाईन करून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जे प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात येऊ लागल्या. यामधून ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे की नाही, याची माहिती समोर येऊ लागली. याच दरम्यान मुंबईत डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली. यामुळे पालिकेने २१ ते २३ डिसेंबरदरम्यान ३७५ कोरोना बाधितांच्या जिनोम सिक्वेसिंग चाचण्या केल्या. त्यातील १४१ जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे १४१ मुंबईचे नागरिक असून त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 5,368 नवीन बाधितांची नोंद, 198 ओमायक्रॉन बाधित आढळले

९५ रुग्णांना लक्षणे नाहीत -

मुंबईत आढळलेल्या १४१ ओमायक्रॉन रुग्णांपैकी ८९ पुरूष आहेत तर, ५२ महिलांना संसर्ग झाला आहे. १४१ पैकी ७ रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. ३९ रुग्णांना सौम्य लक्षणे आणि ९५ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. ९३ रुग्णांनी लसीचे दोन डोस घेतलेले आहेत. तर ३ रुग्णांनी लसीचा एक डोस घेतला आहे.

सर्वाधिक रुग्ण के पश्चिम विभागात -

मुंबईतील के पश्चिम विभागात एकीकडे कोविडचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉनचे रुग्णही वाढले आहेत. या वाॅर्डात एकूण २१ ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर डी विभागात ११, एफ उत्तर विभागात १०, एम पश्चिम विभागात १० रुग्ण आढळून आले आहेत. तर सर्वात कमी टी विभागात १, एल विभागात २, आर दक्षिण विभागात २ रुग्ण आढळून आले आहेत.

विभागवार रुग्ण -
विभाग रुग्ण
ए 7
डी 11
ई 3
एफ उत्तर 10
एफ दक्षिण 7
जी उत्तर 6
जी दक्षिण 8
एच पूर्व 4
एच पश्चिम 10
के पूर्व 3
के पश्चिम 21
एल 2
एम पूर्व 4
एम पश्चिम 8
एन 3
पी उत्तर 6
पी दक्षिण 7
आर मध्य 8
आर उत्तर 3
आर दक्षिण 2
एस 7
टी 1
एकूण 141

Last Updated :Dec 31, 2021, 3:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.