ETV Bharat / state

Pandey demand for inquiry : सोमैय्यांवरील हल्ल्याच्यावेळी 'ते' जवान काय करत होते, संजय पांडेंची महासंचालकांकडे चौकशीची मागणी

author img

By

Published : Apr 27, 2022, 12:58 PM IST

Updated : Apr 27, 2022, 2:20 PM IST

Sanjay Pande
संजय पांडे

भाजप नेते किरीट सोमैय्या (BJP leader Kirit Somaiya) हल्ला प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी सीआयएसएफ च्या महासंचालकांना (Director General of CISF) पत्र पाठवले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, सोमैय्या यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी सीआयएसएफ जवान काय करत होते याची चौकशी (Pandey demand for inquiry) करावी.

मुंबई: किरीट सोमैय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सीआयएसएफने मुंबई पोलिसांना जाब विचारला त्यानंतर मुंबई पोलिसांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. सोमैय्यांना केंद्रसरकारची झेड सिक्युरिटी आहे. मग त्यांच्यावर हल्ला होत असताना सीआयएसएफचे जवान कुठे होते याची चौकशी करा अशा आशयाचे पत्र पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी लिहिले आहे. यामुळे केंद्र विरुद्ध मुंबई पोलीस असे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. सीआयएसएफचे महासंचालक काय करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी त्यांच्यावर शनिवारी हल्ला झाल्यानंतर या प्रकरणाची तक्रार केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली, नंतर केंद्रीय गृहमंत्रालयाची सुरक्षा असलेल्या सीआयएसएफच्या महासंचालकांनी या प्रकरणाची माहिती विचारणा करण्या करता मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवले. या पत्राला उत्तर देताना संजय पांडे यांनी सीआयएसएफ च्या जवानांची चौकशी करण्यात यावी असे कळवलेआहे.

राणा दाम्पत्याला 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमैय्या खार पोलीस स्टेशनमध्ये गेले. ते आल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यात सोमैय्यांच्या गाडीची काच फुटली आणि ते जखमी झाले. मात्र झेड सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीवर दोन वेळा कसा हल्ला होतो असा जाब सीआयएसएफने मुंबई पोलिसांना विचारला होता. त्याला मुंबई पोलिसांनी उत्तर दिले आहे.

हेही वाचा : Somaiya On Sanjay Pandey : पोलीस आयुक्त संजय पांडेंना शिवसेनेत जायचे आहे - सोमैय्या

Last Updated :Apr 27, 2022, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.