ETV Bharat / state

Mumbai Shopkeeper: गाण्याच्या कॅसेट, टेपरेकॉर्डर विकणारे दुकानदार सध्या काय करतात ? वाचा सविस्तर

author img

By

Published : Dec 9, 2022, 10:44 AM IST

Mumbai Shopkeeper
Mumbai Shopkeeper

Mumbai Shopkeeper: 70 च्या दशकापासून माझे इथे दुकान आहे. मित्राकडे काही कॅसेट होत्या, त्या मी इथे विकायला ठेवले. त्यावेळी कॅसेटची मागणी होती. लोक विकत घ्यायची. Mumbai Shopkeeper Latest News काळ बदलत गेला आणि सीडी आल्या. मी दुकानात सीडी देखील ठेवायला सुरुवात केली. Mumbai Latest News मित्राकडच्या 50 कॅसेट विकल्यावर हातात थोडे पैसे आले आहे. त्या पैशात मी आणखी काही कॅसेट घेतल्या आणि माझं दुकानाच सुरू केलं आहे.

मुंबई: भारतात 80 आणि 90 च्या दशकात ऑडिओ कॅसेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. यानंतर भारतात सीडीच्या वापराला वेग आला. कालांतराने या सीडी देखील कालबाह्य झाल्या आणि त्याची जागा मेमरी कार्डने घेतली. गावागावात मेमरी कार्डमध्ये गाणी भरून देणारी दुकान सुरू झाली. जसजशी टेक्नॉलॉजी बदलत गेली, तसं मेमरिकार्ड देखील कालबाह्य झालं आणि मोबाईलमध्ये इंटरनल स्टोरेज द्यायला सुरुवात झाली. Mumbai Shopkeeper Latest News आता तुम्हाला तुमच्या पसंतीचे कोणतेही गाणे ऐकायचे असेल, तर ते तुम्ही गुगलवरून सहज डाऊनलोड करू शकता किंवा युट्युबवर देखील पाहू शकता. या बदललेल्या तंत्रज्ञानामुळे मेमरीकार्ड पासून ते अगदी कॅसेटपर्यंत सर्व गोष्टी कालबाह्य झाले आहे. Mumbai Latest News त्या आज फक्त एक संग्रहाच्या वस्तू म्हणून वापरात राहिल्या आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का ? एकेकाळी या टेप रेकॉर्डर सीडीची गल्लोगल्ली दुकान दिसायची हे सीडी विक्रेते सध्या काय करतात ?

दुकानदार सध्या काय करतात

70 च्या दशकांपासून दुकान: याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही मुंबईतील सीएसटी स्थानकावर या जुन्या सीडी आणि कॅसेट विकणाऱ्या अब्दुल रझाक यांना गाठलं. अब्दुल यांचं CSMT स्थानकाबाहेर जुन्या सीडी आणि कॅसेटचे दुकान आहे. आपल्या दुकानाबाबत बोलताना अब्दुल सांगतात की, सत्तरच्या दशकापासून माझे इथे दुकान आहे. मित्राकडे काही कॅसेट होत्या, त्या मी इथे विकायला ठेवले. त्यावेळी कॅसेटची मागणी होती. लोक विकत घ्यायची. काळ बदलत गेला आणि सीडी आल्या. मी दुकानात सीडी देखील ठेवायला सुरुवात केली. मित्राकडच्या 50 कॅसेट विकल्यावर हातात थोडे पैसे आले आहे. त्या पैशात मी आणखी काही कॅसेट घेतल्या आणि माझं दुकानाच सुरू केलं आहे.

खरंच लोकं या कॅसेट विकत घेतात का? आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्यावर आहे. या दुकानदारांचे पुढे काय झालं? अब्दुल आजही सीएसटी स्थानकाबाहेर त्यांच्या दुकानात सीडी आणि कॅसेट विकतात. मात्र, त्यांच्या दुकानातील या सीडी आणि कॅसेट बघून आम्हाला देखील प्रश्न पडला होता की, खरंच आजही लोक हे विकत घेतात का? आणि याआधी जी लोकं सीडी आणि कॅसेट विकायचे त्यांचं काय झालं? या प्रश्नावर उत्तर देताना अब्दुल रजाक सांगतात की, असं नाही. या जुन्या गोष्टी आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहे. आजही जुनी गाणी ही सीडी आणि कॅसेटवर ऐकणारे अनेक शौकीन लोक आहेत. ते आम्हाला फोन करून इथे येतात. अनेकजण ऑनलाईन मागवतात. त्यामुळे हा जो समज झाला की, ही गोष्ट पूर्णपणे कालबाह्य झाली तर ती चुकीची आहे. विशेष म्हणजे तुम्हाला वाटेल की जे लोक खरेदी करतात. त्यात अनेकजण वृद्ध, वयस्कर असतील की ज्यांना जुन्या काळात रमायला आवडेल. मात्र, असं नाही. अनेक तरुण आमच्याकडे येतात आणि जुन्या काळातल्या गाण्यांच्या कॅसेट मागतात. तरुणांचा देखील या कॅसेटसाठी चांगला प्रतिसाद आहे.

कॅसेट विकणाऱ्या दुकानदारांचे पुढे काय झालं? या कॅसेट विकणाऱ्या दुकानदारांचे पुढे काय झालं ? या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देताना अब्दुल रझाक सांगतात की, तुम्हाला बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदलणे गरजेचे असतं. तुम्ही जर जुन्या प्रवाहात अडकून राहिलात, तर तुमचा व्यवसाय ठप्प पडतो. माझं दुकान जरी जुन्या कॅसेट्स सीडी मिळणार असलं, तरी मी बदलत्या प्रवाहानुसार माझ्या व्यवसायात तंत्रज्ञान आणलं. मी माझा व्यवसाय ऑनलाईन केला. जाहिराती बनवल्या आहेत. लोक कॅसेट घ्यायला येऊ लागली. माझे देखील काही मित्र सीडी कॅसेट विकायचे त्यांनी त्यांचे दुकान बंद करून इतर व्यवसाय सुरू केला. पण, तुम्ही जर मुंबईत पाहिलंत तर असे अनेक जुने कॅसेट विकणारे तुम्हाला दिसतील. त्यामुळे जे प्रवाहासोबत बदलले नाहीत, अपडेट नाही झाले त्यांचा व्यवसाय ठप्प पडला. आम्ही व्यवसायात तंत्रज्ञान आणलं आणि आजही या जुन्या सीडी आणि कॅसेटचा वापर आम्ही टिकवून ठेवला आहे.

ॲनालॉग रेकॉर्डिंगमुळे लोकांची मागणी: आज काल तंत्रज्ञानामुळे तुम्हाला हवं ते गाणं गुगलवरती किंवा युट्युबवरती पाहता किंवा ऐकता येऊ शकत. त्यामुळे बरीचशी जण या कॅसेट घेत नाहीत. तुमच्या छोट्या मोबाईलमध्येच तुम्हाला सर्व काही उपलब्ध असतं. मात्र, तरी आजच्या काळात लोक या कॅसेट घेतात, याचा अर्थ नक्कीच काहीतरी खास असणार. हे खास नेमकं काय? हे आम्ही जेव्हा अब्दुल यांना विचारलं त्यावर ते सांगतात की, या ज्या कॅसेट आहेत. त्या ॲनालॉग रेकॉर्डिंगच्या आहेत. या रेकॉर्डिंगच्या कॅसेट तुम्ही जी युट्युब आणि गुगलवर गाणी ऐकता, त्याच्यामध्ये ऑडिओ कॉलिटीचा फरक आहे. जसे तुमच्या कपड्याच्या ब्रँड मध्ये आणि शूज ब्रँड मध्ये फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी असते. तसेच या गाण्यांच्या कॅसेटमध्ये देखील असते. रेकॉर्डिंग म्हणजे ओरिजनल रेकॉर्डिंग फर्स्ट कॉपी त्यामुळे याची ऑडिओ कॉलिटी देखील तितकीच स्पष्ट शार्प आणि ऐकायला मधुर असते. त्यामुळे आजही अनेक गाण्यांचे शौकीन लोक या शिडी आणि कॅसेट विकत घेतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.