ETV Bharat / state

महाराष्ट्रात विदर्भासह 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 10:33 AM IST

Heavy rain is likely in many states including Maharashtra for the next two days
महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

IMD issues rainfall alert : सध्या देशातील बहुतांश राज्यांत अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह काही राज्यांत आजपासून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई IMD issues rainfall alert : हवामान विभागानं आज (27 नोव्हेंबर) महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात आणि दक्षिण राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये आजपासून पुढील दोन दिवस गारपीट आणि मुसळधार पावसासह वादळाचा इशारा दिला आहे. तसंच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या विविध भागातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट : राज्यात आज बुलडाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट', तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा 'येलो अलर्ट' देण्यात जारी करण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, ढगाळ हवामानामुळं कमाल तापमानात घट झाली असून, किमान मध्येही वाढ कायम आहे. तसंच विदर्भात गारठा वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

आज मध्यम पावसाची शक्यता : आज दिवसभर, अकोला अमरावती बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा ,नागपूर जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह उर्वरित विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच मंगळवारी (28 नोव्हेंबर) बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचं, श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंडे यांनी सांगितलं.


पावसाचे कारण काय? : मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेच्या खालच्या थरात कमी दाबाची दोन्ही स्थिती निर्माण झाली आहे. यामुळं एक नवीन पश्चिमी चक्रवाढ वायव्य आणि पश्चिम किनारपट्टीवर धडकला आहे. याचा परिणाम हवेच्या वरच्या थरात पश्चिमेकडून तर खालच्या थरात पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळेच आता नोव्हेंबर महिन्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य प्रदेशासह अनेक ठिकाणी विजेच्या कडकडांसह पाऊस बरसत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात तुरळक ठिकाणी गारपीट कोणाची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. नाशकात अवकाळी पावसानं झोडपलं; द्राक्ष, कांदा पिकाचं मोठं नुकसान
  2. मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस
  3. थंडीत पावसाची अनुभूती! राज्यात पुढील चार दिवस पाऊस, हिवाळ्यात पावसाचं कारण काय?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.