ETV Bharat / state

मुंबईत आग विझवण्यासाठी वॉटर हायड्रेन्ट, वॉटर यार्डमधून केली जाते पाण्याची व्यवस्था

author img

By

Published : Mar 31, 2021, 10:45 PM IST

मुंबईत एकूण 10 हजार 843  वॉटर हायड्रेन्ट आहेत. त्यापैकी 1 हजार 353 वॉटर हायड्रेन्ट सुस्थितीत सुरू असून 9 हजार 290 वॉटर हायड्रेन्ट बंद होते. यामुळे आग विझवताना मोठ्या प्रमाणात पाण्याची अडचण येत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत वेळोवेळी पालिका सभागृह, स्थायी समितीत आवाज उठविण्यात आला होता. त्याची दखल घेत मुंबई महापालिकाने अनेक ठिकाणचे वॉटर हायड्रेन्ट पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम सुरू केले आहे.

मुंबई  वॉटर हायड्रेन्ट
मुंबई वॉटर हायड्रेन्ट

मुंबई - मुंबईत दरदिवशी आग लागण्याच्या घटना घडतात आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. आग विझवण्यासाठी लागणारे पाणी वॉटर हायड्रेन्ट, वॉटर रिफिल सेंटर आणि महापालिकेच्या वॉटर यार्डमधून उपलब्ध करून दिले जाते. जवळपासच्या वॉटर रिफिल सेंटर आणि महापालिकेच्या वॉटर यार्डमधून पाणी उपलब्ध केले जात असल्याने वेळेवर पाणी उपलब्ध होऊन आग विझविणे सोपे होते. अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


वॉटर हायड्रेन्टची परिस्थिती बदलण्यास सुरुवात
मुंबईत आग लागल्यास ती विझविण्यासाठी पाणी त्वरित मिळावे यासाठी वॉटर हायड्रेन्ट उभारण्यात आले आहेत. मुंबईत एकूण 10 हजार 843 वॉटर हायड्रेन्ट आहेत. त्यापैकी 1 हजार 353 सुस्थितीत सुरू असून 9 हजार 290 वॉटर हायड्रेन्ट बंद होते. यामुळे आगी विझवताना मोठ्या प्रमाणात पाण्याची अडचण येत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत वेळोवेळी पालिका सभागृह, स्थायी समितीत आवाज उचलण्यात आला होता. त्याची दखल घेत मुंबई महापालिकाने अनेक ठिकाणचे वॉटर हायड्रेन्ट पुन्हा कार्यान्वीत करण्याचे काम सुरू केले आहे.

यार्ड, रिफिल सेंटरमधून पाणी
आग विझवण्यासाठी जागेवरच पाणी उपलब्ध करून देण्याचे काम वॉटर हायड्रेन्ट करतात. त्याचप्रमाणे आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. हे पाणी मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाच्या यार्डमधून उपलब्ध करून दिले जाते. अग्निशमन दलाच्या पाण्याच्या गाड्या यार्डमध्ये जाऊन पाणी भरतात. पाणी भरलेला टँकर घटनास्थळी पुन्हा येऊन आग विझवण्यासाठी वापरला जातो. मुंबईत अग्निशमन दलाने २६ टँकर फिलिंग पॉईंट लावण्यात आले आहेत. मात्र ते पुरेसे नसल्याने त्यात वाढ करण्याचे पालिकेचे उद्दीष्ट आहे.

माहिती देतांना प्रतिनिधी

मुंबईत हॉस्पिटलला लागलेल्या आगी
मुंबईत नुकतीच भांडुप येथील ड्रीम्स मॉलला आग लागली होती. या आगीत मॉलमधील सनराईज हॉस्पिटलमधील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग विझवायला २३ तासांचा कालावधी लागला होता. त्याआधी मुलुंड येथील ऍपेक्स या कोविड रुग्णालयाला १२ ऑक्टोबर २०२० ला आग लागली होती. त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. १७ डिसेंबर २०१८ ला अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला आग लागली होती. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबईतील इतर अग्नितांडव
२२ ऑक्टोबरला सिटी सेंटर मॉलला आग लागली होती. ही आग ५६ तासांनी विझवली होती. २२ ऑगस्ट २०१८ ला परेल हिंदमाता येथील क्रिस्टल टॉवरला आग लागली होती. त्यात ५ जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर २०१७ मध्ये कमला मिलमधील दोन पबला आग लागून१४ जणांचा मृत्यू झाला होता. याच महिन्यात साकिनाका येथील किनारा हॉटेलला आग लागून १२ जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा-मागील पाच दिवसात पुण्यात आगीच्या सात घटना, कोट्यवधींचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.