ETV Bharat / state

Vijay Wadettiwar Death Threat: विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्र्यांना पत्र लिहून 'ही' केली मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 12:16 PM IST

Updated : Nov 13, 2023, 12:50 PM IST

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना अज्ञात व्यक्तीनं फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वडेट्टीवार यांनी सुरक्षा वाढविण्याची मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पत्राद्वारे मागणी केली.

Vijay Wadettiwar Death Threat
Vijay Wadettiwar Death Threat

नागपूर/मुंबई - राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यामुळं त्यांना धमकी आल्याची माहिती समोर येत आहे. या धमकीनंतर ही बाब वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. विजय वडेट्टीवार हे नागपूरमध्ये असताना धमकी आल्याची माहिती समोर येत आहे.



कोणत्या कारणासाठी आली धमकी?- ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या जरांगे-पाटील यांच्या मागणीला वडेट्टीवार यांनी विरोध केला होता. जरांगे-पाटील यांच्याबाबत बोलल्यानंतर धमक्या आल्याची माहिती समोर येत आहे. ही धमकी मोबाईलवर आली आहे. जरांगे-पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याची टीका विधानसभेतील विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी केली होती. जरांगे-पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवार यांना धमकीचा फोन आणि मेसेज आला आहे.

विजय वडेट्टीवार यांचा जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध- सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा, तीन पोलीस आणि एक गाडी वडेट्टीवारांच्या सुरक्षेत आहे. पण आणखी सुरक्षा वाढविण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या जरांगे-पाटील यांच्या मागणीला वडेट्टीवार यांनी विरोध केला होता. जरांगे-पाटील यांच्याबाबत बोलल्यानंतर धमक्या आल्याची माहिती समोर येत आहे.

छगन भुजबळ यांनाही मिळाली होती धमकी - राज्यात मागील महिन्याभरापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली होती. ओबीसीमधून मराठा आरक्षण देऊ नये, असे वक्तव्य केल्यानं त्यांच्याविरोधात मराठा आंदोलकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसात त्यांना धमकीचा फोन आला होता. या प्रकारानंतर त्यांच्या घराभोवताली पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली होती.

हेही वाचा-

  1. Patra Chawl Scam : 'जास्त फडफड करु नको'; पत्राचाळ घोटाळ्याच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या घरावर फेकलं धमकीचं पत्र
  2. Mukesh Ambani Threat Case : क्रिकेटर शादाब खानच्या नावानं मुकेश अंबानींना धमकी, आरोपीला क्रिकेटच्या मैदानावर सुचली कल्पना
Last Updated :Nov 13, 2023, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.