ETV Bharat / state

Uddhav Thackeray: शिवसेना पक्षावर दावा.. उद्धव ठाकरेंनी सांगितलं 'शिवसेना कशी मिळवणार..' कार्यकर्त्यांना म्हणाले, 'तुम्ही..'

author img

By

Published : Oct 12, 2022, 4:26 PM IST

रायगड जिल्ह्यातल्या उरण मधील अनेक शिवसैनिकांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यातील एका शिवसैनिकाने तर आपल्या पोटावर उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव लिहिलं आहे. या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ( Uddhav Thackeray Guidance workers ) उद्धव ठाकरे यांनी ही कागदावरची लढाई आहे. सदस्य नोंदणी सुरू ठेवा, असे आदेश दिले ( Uddhav Thackeray ordered the activists )आहेत. ongoing court battle regarding Shiv Sena

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? या वादावर आता निवडणूक आयोगाने तात्पुरता तोडगा काढल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मशाल हे निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आले ( flaming torch Uddhav Thackeray election symbol ) आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक मशाल घेऊन त्यांना समर्थन देण्यासाठी मातोश्रीवर जात आहेत. रायगड जिल्ह्यातल्या उरण मधील अनेक शिवसैनिकांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यातील एका शिवसैनिकाने तर आपल्या पोटावर उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव लिहिलं आहे. या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ( Uddhav Thackeray Guidance workers ) उद्धव ठाकरे यांनी ही कागदावरची लढाई आहे. सदस्य नोंदणी सुरू ठेवा, असे आदेश दिले ( Uddhav Thackeray ordered the activists )आहेत. ongoing court battle regarding Shiv Sena

या पोराच्या पोटात आग आहे : यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "या पोराच्या ह्रद्यात आग आहे म्हणून त्याने पोटावर उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव लिहलंय. चिन्हा गोठवले,नाव गोठवले आणि आता रक्त पेटवले. हे सळसळणारे रक्त समोरच्याला राजकारणात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या हक्काचा उरणचा आमदार पाहिजे म्हणजे पाहिजे. नुसत्या घोषणा देवून चालणार नाही. घराघरात मशाल पोहचवण्याचे काम तुम्हाला करायचे आहे." असे आदेश उद्धव ठाकरे यांनी उरण मधून आलेल्या कार्यकर्त्यांना दिले ( Uddhav Thackeray criticizes Shinde group ) आहेत.

उद्धव ठाकरे

सदस्य नोंदणी सुरू ठेवा : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "अजूनही सदस्य नोंदणी सुरू ठेवा. ही लढाई कागदाची आहे, यात आपण हरता कामा नये. काही शिवसैनिकांना कॅनडा ब्रिटनहून फोन आले. ते आश्चर्यकारक होते. ते म्हणाले आम्ही इथं बसून दसरा मेळावा बघत होतोच. पण, आमचे तिकडचे मित्रही दसरा मेळावा बघत होते. आम्ही त्यांना ट्रान्सलेट करून सांगत होतो. जगभरात दसरा मेळाव्याचे चित्र गेले आहे. नुसते सगळ्यांना आणून गोळा केले व ताकद दाखवली असं आपण केले नाही. आपल्यात जिवंतपणा होता."

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करून दाखवणारच : यावेळी उद्धव ठाकरे यांनी उरण मधून आलेल्या कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान देखील केल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे म्हणाले की, "एका बाजूला गोळा केलेली माणसे होती तर दुस-या बाजूला स्वत:हून आलेली तापलेल्या रक्ताची निष्ठावंत माणसे होती. शिवसेना संपवण्याचा ज्या ज्या वेळी प्रयत्न होतो त्या त्यावेळी शिवसेना आघात करणाऱ्याला गाडून चार पटीने उभी राहते. शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करून दाखवणारच." असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी या कार्यकर्त्यांना दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.