ETV Bharat / state

Uddhav Thackeray Support Kapil Sibal : लोकशाही वाचवण्यासाठी कपिल सिब्बल रिंगणात; उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा

author img

By

Published : Mar 4, 2023, 9:58 PM IST

Updated : Mar 4, 2023, 10:35 PM IST

Uddhav Thackeray Support Kapil Sibal
Uddhav Thackeray Support Kapil Sibal

देशात लोकशाही धोक्यात आहे. तिला जिवंत ठेवण्यासाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल रिंगणात उतरले आहेत. यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले असून, सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहन कपिल सिब्बल यांनी केले आहे. त्यांच्या या भूमीकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबई : देशात लोकशाही धोक्यात आली आहे. ती जिवंत ठेवण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी व्यासपीठ उभारले असून सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा,असे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमीकेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. कपिल सिब्बल यांचा निर्णय स्वागतार्ह असून त्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.



लोकशाही मूल्यांना धोका : देशात भाजप सत्तेवर आल्यापासून लोकशाही मूल्यांना धोका निर्माण झाला आहे. सरकार विरोधात आवाज उठवला तर, कारवाई होते, तुरुंगात डांबले जाते. संविधानाऐवजी देश धर्मावर चालत आहे. एकूणच लोकशाहीकडून गुलामगिरीकडे आपण चाललो आहोत. या अन्यायाविरोधात लढण्यासाठी देशातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे. ११ मार्चपासून राष्ट्रीय मोहीम राबवली जाणार आहे. जंतन-मंतर मैदानातून या मोहिमेला सुरुवात होईल. लोकांनमध्ये यातून जनजागृती करण्याचा उद्देश आहे. मोदींना विरोध नव्हे, तर लोकशाही मूल्य जपण्यासाठी सुधारण्याचा आमचा मानस आहे, असे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.


भारत जोडो यात्रेमुळे देशात एकता : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सर्व घटकातील समाज बांधवांना एकत्र आणत आहे. भारत जोडो यात्रेमुळे देशात एकता किती महत्त्वाची आहे, त्याची जाणीव करून दिली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुधारण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षाने यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी या आवाहनाला पूर्ण पाठिंबा दिला.


कपील सिब्बल यांना पाठिंबा : ज्येष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल यांनी आज न्याय व्यवस्था, लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याचे केलेले आवाहन स्वागतार्ह आहे. आपला त्यास पूर्ण पाठिंबा आहे. देशात लोकशाही जिवंत राहावी, अशी ज्यांची ईच्छा असेल त्या सगळ्यांनी कपील सिब्बल याना समर्थन देणे आवश्यक आहे. तसेच सिब्बल यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.


हेही वाचा - Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कांद्याला मिळणार 'इतके' अनुदान

Last Updated :Mar 4, 2023, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.