ETV Bharat / state

Uddhav Thackeray on BJP : भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

author img

By

Published : Feb 12, 2023, 8:36 PM IST

Updated : Feb 12, 2023, 10:49 PM IST

Uddhav Thackeray criticized BJP In Mumbai
उद्धव ठाकरेंचा भाजपवर वर्मी घाव

सध्या हिंदुत्वावरून राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. महाविकास आघाडीसोबत गेल्याने आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका झाली. आम्ही काँग्रेस सोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही आणि भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने आजवर जाती-धर्मात द्वेषभावना निर्माण केली. मात्र, आता भारतीयांना भाजपला उत्तर द्यावे लागेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. तसेच हिंदुत्वाच्या मुद्यांवरून भाजपवर वर्मी घाव घातला.

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) गोरेगाव येथे मुंबईत उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडला. खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, माजी मंत्री सुभाष देसाई, आमदार सुनील प्रभू आदी शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना मार्गदर्शन करताना, आज तुमची साथ मागायला आलो आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून तुम्ही इथे राहत आहात. आपण एकमेकांना हिंदू असून मराठी आणि उत्तर भारतीय वेगळे नाहीत. ते भारतीय आहेत.

  • Balasaheb Thackeray never differentiated b/w Hindus & Muslims. He believed that those who work against the country, no matter their religion, should be punished. And this is our Hindutva. BJP doesn't mean Hindutva; I don't believe in their version of Hindutva: Uddhav Thackeray pic.twitter.com/iVC5oa4pnA

    — ANI (@ANI) February 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदू आणि मुस्लिम असा भेद केला नाही. देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांना मग त्यांचा धर्म असो, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांचे मत होते. आणि हे आमचे हिंदुत्व आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, मी त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येवर विश्वास ठेवत नाही असे, म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रहार केला आहे. दरम्यान, भाजपने आजवर जाती-धर्मात द्वेषभावना निर्माण केली असही ते म्हणाले आहेत.

फक्त अशांनाच बाळासाहेबांचा विरोध: आजवर भाजपने द्वेषभावनेतून राजकारण केले आहे. गेल्या 25-30 वर्षांपासून आमची युती होती. आम्ही निभावली मात्र त्यांनी तोडली. आमची त्या पक्षासोबत आपुलकी होती, जसे केंद्रात जाऊन बसले तसे त्यांनी आम्हाला दूर लोटले, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच 95 पूर्वी शिवसेना आणि भाजपला कुणी साथ देत नव्हते. आमच्यावर धार्मिक असल्याचा ठपका ठेवला गेला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही उत्तर भारतीयांचा किंवा मुस्लिमांचा द्वेष केला नाही. जो देशाच्या विरोधात होता, त्यालाच बाळासाहेबांनी प्रखर विरोध केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


ठाकरे यांचा भाजपला इशारा: भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर ही राम मंदिराचा मुद्दा खितपत पडला होता. परंतु आम्ही भूमिका घेतली. स्वतंत्र कायदा करा. परंतु राम मंदिराचा प्रश्न सोडवा, अशी परखड भूमिका घेत अयोध्येला गेलो. जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो आणि तिथली मूठभर माती प्रभू रामाकडे नेली. त्यानंतर मुख्यमंत्री झालो आणि राम मंदिराचा प्रश्न सुटला, असे सांगत आठवणींना उजाळा दिला. तसेच, महाराष्ट्रात राम-राम म्हणतो आणि तुमच्याकडे जय श्रीराम म्हणतात. बिहारमध्ये जयसीया राम बोलतात. शेवटी राम आहेच. 'राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे' असे बाळासाहेब म्हणायचे. हेच आमचे संस्कार असून ते जोपासत असल्याचे ठाकरे यांनी सांगत भाजपला इशारा दिला.


आम्ही हिंदूच आहोत आणि राहू : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यावर हिंदुत्व सोडले अशी, टीका झाली. आम्ही कधीही कोणावर अत्याचार केला नाही. कोरोना काळात ही माणुसकी जपली. भाजप जाणीवपूर्वक आरोप करत आहे. आम्ही घाबरत नाही. आम्ही हिंदू होतो, आजही आहोत आणि उद्याही हिंदूच राहू, असे सांगत, भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, अशा शब्दांत ठणकावले. भाजप सांगेल ते ऐकणार हे चालणार नाही. भाजपने आजवर जाती-धर्मात वाद निर्माण करायचा प्रयत्न केला. तसे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : H. K. Patil : थोरात लवकरच राजीमाना मागे घेतील; चर्चेनंतर एच.के पाटलांची प्रतिक्रिया

Last Updated :Feb 12, 2023, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.