ETV Bharat / state

Tushar Gandhi Detain: भारत छोडो आंदोलनादिवशीच पोलिसांनी का ताब्यात घेतले? तुषार गांधींनी केला मोठा दावा

author img

By

Published : Aug 9, 2023, 10:11 AM IST

Updated : Aug 9, 2023, 4:17 PM IST

देशभरात ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे. दुसरीकडे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त तुषार गांधी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यावर तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Tushar Gandhi Detain
तुषार गांधींना सांताक्रुझ पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना सांताक्रुझ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऑगस्ट क्रांतीच्या दिनानिमित्त 'शांती यात्रा' काढण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचू नये यासाठी तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

आज 9 ऑगस्ट म्हणजेच 'भारत छोडो' आंदोलना'चा वर्धापनदिन आहे. यानिमित्त मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि ऑगस्ट क्रांती मैदान येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ऑगस्ट क्रांती मैदानावर शांततापूर्ण मोर्चात सामील होण्यास निघालेल्या महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आणि महात्मा गांधी यांचे अनुयायी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी. जी. पारेख (वय वर्षे 99) यांना सांताक्रुझ पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी गिरगाव चौपाटी, ऑगस्ट क्रांती मैदान येथे एकत्र जमण्यास आणि आंदोलनासाठी परवानगी नाकारली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


ऐतिहासिक तारखेला पोलिसांनी घेतले ताब्यात- महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना सांताक्रूझ पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. त्यांनी स्वत: ट्विटरवर याची माहिती दिली. 'भारत छोडो' आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त ते ऑगस्ट क्रांती मैदानावर शांततापूर्ण मोर्चासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सांताक्रुझ पोलिसांनी तुषार गांधी यांना ताब्यात घेतले. तुषार गांधी यांनी ट्विटरवर लिहीले की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मला ताब्यात घेण्यात आले आहे. ९ ऑगस्ट रोजी, भारत छोडो आंदोलनाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मी माझ्या घरातून बाहेर पडलो होतो. सांताक्रूझ पोलिसांकडून मला ताब्यात घेण्यात आले. या ऐतिहासिक तारखेला ब्रिटीशांनी ताब्यात घेतलेल्या माझ्या आजी-आजोबांचा यांचा मला अभिमान आहे.

ट्विट करून दिली सुटकेची माहिती- याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ट्विटरवर वापरकर्त्याला उत्तर देताना तुषार गांधींनी सांगितले की, 'ऑगस्ट क्रांती' मैदानावर शांततापूर्ण मोर्चाची तयारी होती. पण कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान म्हणून याकडे पाहिले जात आहे. तुषार गांधी यांना त्याच्या समर्थकांसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना इतर लोकांसोबत बसमध्ये बसवण्यात आले. तुषार गांधी यांनी पोलीस ठाण्यातूनच ट्विट करून आपली सुटका होताच 'ऑगस्ट क्रांती' मैदानावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. 'ऑगस्ट क्रांती दिन' नक्कीच साजरा होणार आहे.


तुषार गांधींही दिसले होते 'भारत जोडो' यात्रेत: महाराष्ट्रातील बुलडाणा येथे राहुल गांधींबरोबर 'भारत जोडो' यात्रेत तुषार गांधीदेखील दिसले होते. तुषार यांचे पूर्ण नाव तुषार अरुण गांधी आहे. त्यांचे वडील पत्रकार अरुण मणिलाल गांधी होते. गांधीजींचे पुत्र मणिलाल गांधी यांचे ते नातू आहेत. त्यांनी गुजरातमधील वडोदरा येथे महात्मा गांधी फाउंडेशनची स्थापना केली आहे. ते आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतात. कस्तुरबा गांधींच्या नावाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या मुलीचे नाव 'कस्तुरी' ठेवले आहे.

सांताक्रुझ पोलिसांनी घराबाहेर जाण्यापूर्वीच ताब्यात घेतले. पोलिसांनी चांगली वागणूक दिली आहे. सत्ताधाऱ्यांना ऑगस्ट क्रांतीचा अभिमान नाही. कदाचित चळवळींच्या आत्म्याला पुनरुज्जीवन मिळू नये, यासाठी अशी कारवाई केली असावी-महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी

पोलिसांनी चांगली वागणूक दिली- तुषार गांधी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही 'शांती यात्रा' काढत होतो. मात्र, शांतता यात्रा काढत असताना कायदा व सुव्यवस्थेचा धोका होण्याचा सत्ताधाऱ्यांना धोका वाटला. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नव्हता. ते आज 'क्रांती दिना'निमित्त फुले वाहत आहेत. हा मोठा विनोद आहे. पोलिसांनी तुषार गांधींना रोखले ही गंभीर बाब आहे.

हेही वाचा-

  1. Independence Day 2023 : ऑगस्ट क्रांती दिन 2023; जाणून घ्या भारतीय स्वातंत्र्याचा कसा रचला पाया
Last Updated :Aug 9, 2023, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.