ETV Bharat / state

Trans Harbor Link project : ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार

author img

By

Published : Nov 13, 2022, 7:29 PM IST

Trans Harbor Link project
ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

भारतातील समुद्रामध्ये सर्वात लांबीचा पूल ( longest bridge across the sea in India ) ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे ( Trans Harbor Link project ) 700 मीटर काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प ( Trans Harbor Link project ) या प्रकल्पाचे फक्त 700 मीटरचे टनेलचे काम बाकी आहे. ते काम येत्या महिन्याभरात पुर्ण होण्याची शक्यता आहे.

ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

महाराष्ट्र शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळेला त्यांचा अत्यंत महत्त्वकांक्षी असा हा प्रकल्प गणला गेला. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस स्थापन झाले. या शासनाने या प्रकल्पाला गती ( Speeding up the Mumbai Trans Harbor Link project ) देण्याचे काम त्यांनी केले.हा पूल जर डिसेंबर 2023 मध्ये खरोखर पूर्ण झाला तर भारतातील आज सर्वात लांबीचा समुद्रावरील पूल ( longest bridge across the sea in India ) ठरणार आहे. या कामाचे कंत्राट एल अँड टी आणि टाटा यांना दिलेले आहे. तसेच या प्रकल्पासाठी जायका म्हणजे जापान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी ( Japan International Corporation Agency ) यांच्याद्वारे अर्थ पुरवठा केला जातोय.

काय आहे प्रकल्पाची सद्यस्थिती - प्रकल्पाचे 85 काम पूर्ण झालेले आहे.मुं बई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईतील दक्षिण भागातील शिवडी या ठिकाणाहून सुरू होणार हा वरळीला कनेक्ट होणार आणि तो पुढे ईस्टर्न फ्री वे यांना जोडण्यासाठी तीन स्तरीय इंटरचेंजिंगची योजना या प्रकल्पामध्ये आहे. या प्रकल्पामध्ये 22 km लांबीचा हा पूल असेल आणि सहा रांगांमध्ये रस्ता विभागला जाईल. म्हणजे 6 रस्ते असेल आणि दोन्ही बाजूला जमिनीवर सुमारे 16.5 किमी लांबीचे सागरी मार्ग असतील आणि समुद्रात साडेपाच किलोमीटर लांबी पर्यंत रस्ते असतील.


84 टक्के प्रकल्पाचे काम पूर्ण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच या प्रकल्पाच्या कामाचे पाहणी करून आढावा घेतला त्याच वेळेला वक्तव्य केलं होतं की," हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. हा प्रकल्प झाल्यावर राज्याच्या आणि मुंबईच्या आर्थिक वाढीचे इंजिन ठरेल तसेच मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाद्वारे रोजगार निर्माण होण्यास मदत देखील होईल." मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा भारतातील अद्वितीय पूल ठरणार आहे. या पुलाच्या सुरुवातीची टोक मुंबईतील शिवडी या ठिकाणी असेल आणि शिवाजीनगर या ठिकाणी तसेच राज्य महामार्ग 54 आणि नवी मुंबईच्या शेजारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 348 अर्थात चिरले गाव येथे त्याचे एक टोक असणार.

या प्रकल्पाचे टप्पे - हा प्रकल्प टप्पा एक म्हणजे शिवरी पासून तर मेकर पर्यंत साधारणता 10.38 किलोमीटर असा आहे त्याचा दुसरा टप्पा मेकर साडेदहा किलोमीटर ते 18 किलोमीटर पर्यंत असा आहे जो समुद्रात आहे. तिसरा टप्पा हा 18 किलोमीटर पासून तर राष्ट्रीय महामार्ग 4b चिरले इथपर्यंत म्हणजे एकूण साडेतीन किलोमीटरचा हा मार्ग जमिनीवर असेल तर चौथा टप्पा हा इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम या रीतीने बांधलाजाणार आहे.


प्रकल्पाचा खर्च - या प्रकल्पाची अंदाजीत खर्चाची रक्कम 17 हजार 843 कोटी आहे या प्रकल्पाची एकूण लांबी 21.80 अर्थात २२ किलोमीटर आहे. यातील केवळ पुलाची लांबी 18 किलोमीटर पेक्षा थोडी अधिक आहे. यासाठी लागणारे सर्व मटेरियल हे कॉन्सन्ट्रेट स्टील या प्रकारातले आहे. याची रुंदी 27 मीटर असून सहा रांगा असलेला हा रस्ता असणार आहे. याला सर्वात मोठे सहकार्य जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी अर्थात जायका यांनी मदत केलेली आहे . हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याद्वारे राबवला जात आहे.

येत्या डिसेंम्बर मध्ये 700 मीटर टनेलचे काम पूर्ण होणार - यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी याबाबत खुलासा केला की," पुढील महिनाभरात या मार्गाच्या संदर्भात 700 मिटर टनेल आणि इतर कामे पूर्ण होतील. आणि डिसेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच हा 2014 या वर्षापासूनच तत्कालीन मुख्यमंत्री यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून त्यावेळेला गणला गेला होता. सप्टेंबर 2023 पर्यंत याची सर्व कामे पूर्ण होतील आणि पुढील बारीक सारीक रंगरंगोटी आणि इतर तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2023 पर्यंत वेळ लागणार आहे."

पर्यावरणाचे भान राखायला हवे - यासंदर्भात पर्यावरण तज्ञ एडवोकेट गिरीश राऊत यांनी सांगितलं की ,"आपण विकासासाठी पर्यावरण समुद्र वातावरण याची फारशी फिकीर करत नाही. वांद्रे वरळी सीलिंग केल्यामुळे त्याचा परिणाम स्थानिक पर्यावरणावर झालाय. मच्छीमारांवर झाला आहे .त्यामुळे येणारे धोके वाढलेले आहे. तसेच धोके या प्रकल्पाबाबत पण आहे. शासनाने आणि या संदर्भातल्या प्रकल्पाच्या समर्थकांनी कितीही सांगितलं तरी याचे धोके पुढील काळात आपल्याला दिसणार."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.