ETV Bharat / state

Today Vegetables Rate: गुढीपाडव्याचा मुहूर्तावर एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर वाढले

author img

By

Published : Mar 22, 2023, 9:00 AM IST

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

आज हिंदू नववर्षाची सुरुवात झाली. गुढीपाडवा सणांच्या दिवशी एपीएमसी मार्केटमध्ये वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे.

नवी मुंबई: आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ६००० रुपये ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ४५०० रुपये ते ५००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ७५०० ते १०००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये आहे.

Today Vegetables Rate
मार्केटमध्ये भाज्यांचे दर वाढले



भाज्यांचे दर: काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ५००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४०० रुपये आहे.



फळभाज्या: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये आहे. तर तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४७०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये आहे.



पालेभाज्या: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ९०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये आहे.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये मिरचीच्या वाढत्या दराचा ग्राहकांना ठसका वाचा आजचे भाज्यांचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.