ETV Bharat / state

Mumbai Corona Update: सावधान! तीन नवजात बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचा संशय; चाचणीसाठी पाठवले मुने

author img

By

Published : Mar 28, 2023, 10:53 AM IST

Corona Update
कोरोनाची बाधा

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईत सध्या 589 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर 25 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मुंबईत आतापर्यंत 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात इन्फ्लुएंझा आजाराचे रुग्ण वाढत असताना कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूची रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या एकूण 52 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. 25 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तीन महिलांची प्रसूती झाली असून त्यांच्या नवजात बालकांना कोरोना झाल्याचा संशय असल्याने त्यांचे आरटीपीसीआरचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

बालकांना कोरोनाचा संशय : मुंबईत गेले तीन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. कोरोना आटोक्यात आला असताना पुन्हा एकदा हा प्रसार सुरू झाला आहे. सध्या मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालयात 35 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 19 रुग्ण सामान्य वॉर्डमध्ये दाखल आहेत. 5 गर्भवती महिला आयसीयूमध्ये दाखल आहेत. तीन महिलांची प्रसूती झाली आहे. या महिलांच्या नवजात बालकांना कोरोनाची लागण झाली आहे? का याची शहानिशा करण्यासाठी त्यांचे आरटीपीसीआर नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यावर या बालकांना कोरोनाची लागण झाली आहे का? याची माहिती समोर येणार आहे.



इतर रुग्णालयातील रुग्ण अधिक : मुंबईमध्ये कोरोना पसरण्याच्या भीतीमुळे कस्तुरबा रुग्णालय तसेच सेवन हिल रुग्णालयात बेडस सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयात बहुतेक रुग्ण हे 21 ते 76 या वयोगटातील आहेत. सदर रुग्णांना खाजगी तसेच इतर रुग्णालयातून या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सहा गर्भवती महिला या रुग्णालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पाच महिला आयसीयूमध्ये आहेत. इतर गंभीर आजार असलेले रुग्णउपचारासाठी दाखल आहेत. यात वृद्धांचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.




मुंबईत इतके रुग्ण : मुंबईत सध्या 589 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यापैकी 52 रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत. त्यामधील 25 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. काल 27 मार्च रोजी 66 नवीन रुग्ण आढळून आल्याने रुग्णांचा आकडा 11 लाख 56 हजार 450 वर पोहचला आहे. मुंबईत आतापर्यंत 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Corona Update राज्यात कोरोनाच्या 397 तर मुंबईत 123 रुग्णांची नोंद वाचा सविस्तर आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.