ETV Bharat / state

'एटीएस'नं केरळात जाऊन आरोपीच्या आवळल्या मुसक्या; मुंबई विमानतळावर पाठवला होता धमकीचा मेल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 3:55 PM IST

Updated : Nov 24, 2023, 5:08 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Mumbai Airport Threat Email : मुंबई पोलिसांना सातत्याने धमकीचे फोन आणि मेल येत असतात. मुंबई विमानतळावर बॉम्बने उडवून देणारा धमकीचा मेल प्राप्त झाला होता. यानंतर लगेच मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला केरळमधून अटक केली आहे.

मुंबई Mumbai Airport Threat Email : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट (Mumbai Airport Bomb Threat Email) घडवून आणण्याची धमकी देणारा मेल करणाऱ्या आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाने तिरुवनंतपुरममधून (Mumbai ATS) अटक केली असल्याची माहिती एटीएस प्रमुख सदानंद दाते (ATS Chief Sadanand Date) यांनी दिली. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३८५ आणि ५०५ (१) (बी) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता. दरम्यान, एटीएसने तपासाची चक्रे जोरदार फिरवून आरोपीच्या मुसक्या तिरुवनंतपुरममधून (Thiruvananthapuram) आवळल्या आहेत.

प्रकरणाचा सखोल तपास : मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला होता. बॉम्बस्फोट टाळण्यासाठी 48 तासात 10 लाख डॉलर भरण्याची मागणी मेल पाठवणाऱ्याने केली होती आणि तेही बिटकॉइनमध्ये, असे मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. यानंतर मुंबई पोलीस आणि 'एटीएस'ने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला होता.

काय दिली होती धमकी? : सहार पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “quaidacasrol@gmail.com” या ईमेल आयडीचा वापर करून धमकीचा ईमेल आला होता. पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीने आज सकाळी 11 वाजता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता. धमकीच्या मेलमध्ये आरोपीने लिहिले होते की, 'तुमच्या विमानतळासाठी ही शेवटचा इशारा आहे. जर असे झाले नाही तर आम्ही 48 तासांच्या आत विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोट करू, जर असे घडवायचे नसेल तर आम्हाला Bitcoin मध्ये 10 लाख डॉलर्स पाठवा आणि 24 तासांनंतर दुसरी सूचना दिली जाईल'.

आरोपीला तिरुवनंतपुरममधून अटक : ज्या आयपी अॅड्रेसचा वापर करून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता, त्याचा शोध घेण्यात 'एटीएस'ला यश आले आहे. त्रिवेंद्रममधून अटक केलेल्या आरोपीला मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

एटीएसची केरळमध्ये जाऊन कारवाई : एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ११:०६ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईच्या ईमेल आयडीवर अनोळखी व्यक्तीने 'This is final warning to your airport. We will blast the terminal-2 within 48 hrs unless 1 miliion dollars in the bitcoin' असा धमकीचा मजकूर असलेला ईमेल पाठविला होता. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकामार्फत या गुन्ह्याच्या समांतर तांत्रिक तपासामध्ये धमकीचा मेल हा केरळ येथून पाठविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एटीएसचे पथक तातडीने केरळ येथे रवाना झाले. नंतर पथकानं धमकीचा ईमेल पाठवणाऱया व्यक्तीचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतलं असून, त्याला सहार पोलीस ठाणे यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात येणार आहे.

हेही वाचा -

  1. मुंबई विमानतळ उडवण्याची ईमेलवरून धमकी; प्रशासनाकडं केली अजब मागणी
  2. मुंबईत मोठं कांड होणार , अज्ञाताचा मुंबई नियंत्रण कक्षाला कॉल
  3. देवेंद्र फडणवीस, मंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी; विदर्भवादी नेत्यावर गुन्हा दाखल
Last Updated :Nov 24, 2023, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.