ETV Bharat / state

MLAs Disqualification Case : 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर घ्या, ठाकरे गटाचे विधानसभा उपाध्यक्षांना निवेदन

author img

By

Published : May 15, 2023, 7:22 PM IST

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. झिरवळ यांची भेट घेतल्यानंतर प्रतोद सुनील प्रभू यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Sunil Prabhu
नरहरी झिरवळ यांना निवेदन

माहिती देताना सुनील प्रभू

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला. पण शिंदे गटाच्या 16 आमदारांविषयी सर्वोच्च न्यायालयाने कोणताच निर्णय दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लवकर हाताळला जावा, यासाठी आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, अनिल परब, सचिन अहिर, सुनील राऊत, मनीषा कायंदे, सुनील शिंदे, विलास पोतनीस आदी नेते यावेळी उपस्थित होते.



नरहरी झिरवळ यांची घेतली भेट: सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपत्या बाबतचा निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी लवकर सुनावणी घ्यावी असे म्हटले आहे. या संदर्भात आज ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देत कारवाईची मागणी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित नसल्याने उपाध्यक्षाकडे निवेदन देण्यात आले.

निर्णय लवकरात लवकर घ्यावा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी निवेदन दिल्याची माहिती शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या यावेळी अध्यक्षांना दिले आहेत. न्यायालयाच्या निकालानुसार निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे. मणिपूरमध्ये अशाच एका प्रकरणाचा निर्णय झटपट झाला होता. त्यामुळे अध्यक्षांनी देखील महाराष्ट्रातील निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी विनंती लोकशाही आणि संविधानानुसार आज केली. आमचा तो अधिकार आहे. येत्या पंधरा दिवसात याबाबत निर्णय येईल, अशी आमची अपेक्षा असल्याचे प्रभू म्हणाले.



सुनावणी अध्यक्षांकडे प्रलंबित: सोळा आमदारांसह 24 आमदारांच्या सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहेत. अध्यक्षांनी या संदर्भात निर्णय घ्यायला हवा. अध्यक्ष आज उपस्थित नव्हते. अध्यक्ष नार्वेकर आल्यानंतर आम्हाला पुन्हा यावे लागले तर येऊन भेट घेऊ. आगामी अधिवेशनात सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार काम करू असे सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.



ठाकरे गट आक्रमक : सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय सोपवला आहे. शिंदे गटाचे गटनेते, प्रतोद यांची निवड बेकायदेशीर ठरवली आहे. तसेच, पक्षादेश शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे कायम ठेवले आहेत. त्यानुसार या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरच घेतला जावा, यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. विधानसभा अध्यक्ष आणि या संदर्भात निर्णय घेतल्यास पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठाकरे गटाकडून ठोठावले जाण्याची शक्यता आहे. शिवाय शिंदे गटाला अडचणीत आणण्यासाठी विधानसभा अध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव देखील आणला जाण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut FIR म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
  2. Ajit Pawar on MLAs Disqualified सोळा आमदार अपात्र झाले तरीही सरकारला कोणताच धोका नाही विधानानंतर अजित पवार पुन्हा चर्चेत
  3. Rahul Gandhi मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना हजर राहण्यापासून सूट 4 जुलै रोजी हायकोर्टात पुन्हा सुनावणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.