ETV Bharat / state

अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक; आझाद मैदानावर पोलिसांचा शिक्षकांवर लाठीचार्ज

author img

By

Published : Aug 27, 2019, 2:55 PM IST

मुंबई

शिक्षक आझाद मैदानातून थेट मंत्रालयावर मोठ्या संख्येने जायला निघाले असताना पोलीस व शिक्षक यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिक्षक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्जदेखील केला आहे.

मुंबई - राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थ विभागाने तरतूद केली. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर ८ दिवसांत कॅबिनेटची बैठक घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू, येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षकांचे वेतन सुरू होईल, या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनपूर्तीसाठी मंत्रालयात कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नसल्याने पुन्हा अनुदानाची आशा मावळलेल्या शिक्षकांनी मुंबईत आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून अर्धनग्न आंदोलन केले आहे. ते आंदोलन सोमवारी तीव्र झाले आहे.

राज्यातील शिक्षक आक्रमक; मागण्या मान्य करा; अन्यथा मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा इशारा

शिक्षक आझाद मैदानातून थेट मंत्रालयावर मोठ्या संख्येने जायला निघाले असताना. पोलीस व शिक्षक यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिक्षक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्जदेखील केला आहे. यामुळे अनेक शिक्षक जखमीदेखील झाले आहेत.

Intro:Body:

राज्यातील शिक्षक झाले आक्रमक;मागण्या मान्य करा अन्यथा मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा दिला इशारा





राज्यातील विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थ विभागाने तरतूद केली. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर आठ दिवसांत कॅबिनेटची बैठक घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू. येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षकांचे वेतन सुरू होईल, या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनपूर्तीसाठी मंत्रालयात  कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नसल्याने पुन्हा अनुदानाची आशा मावळलेल्या शिक्षकांनी मुंबईत आझाद मैदानावर गेल्या चार दिवसापासून अर्धनग्न आंदोलन केले आहे.ते आंदोलन आज तीव्र झाले आहे शिक्षक आझाद मैदानातून थेट मंत्रालायवर मोठ्या संख्येनं जायला निघाले असताना. पोलीस व शिक्षक यांच्यात तणावाची परिस्थिती दिसली.शिक्षक आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठ्यांचा मारा केला.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.