मुंबई : मुंबईत गोवर संसर्गाची साथ पसरली आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना (Take immediate measures to prevent measles infection) कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई मनपाला (CM Directs BMC) दिल्या आहेत. मुंबईत गोवर संसर्ग वाढत आहे. या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून आढावा घेतला. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे, याबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचना : मुंबईत ज्या मुलांना गोवरची लागण झाली असून; रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे. तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच या संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून; आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
संसर्गजन्य आजार : गोवर ज्याला गोवरी, माता, खसरा, मिजल्स, ओरी अशा विविध नावाने ओळखला विषाणूमुळे होणारा हा आजार आहे. हा अत्यंत संसर्गजन्य असा आजार आहे. हा आजार हवेतून रॉफ्लेट इन्फेक्शन म्हणून पसरतो. हा आजार साधारणपणे सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना जास्त प्रमाणात होतो.
गोवर संसर्गाची लक्षणे कोणती? : सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भिती असते.
गोवर संसर्गावर उपचार काय? : हा आजार बरेचजण अंगावर काढतात. दैवी अंघोळ, जडीबुटी असे उपचार करून पाहतात. असे न करता जेव्हा बाळाला ताप आणि पुरळ येतात तेव्हा त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जाऊन अचूक निदान आणि उपचार करून घ्यावे. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, हायड्रेशन, व्हिटॅमिन ए, पॅरासिटामॉल अशाने हा आजार बरा होतो.
संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल? : या आजारावर अत्यंत प्रभावी अशी MR आणि MMR अशी लस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. सर्व बालकांना या लसीचे दोन डोस देण्यात येतात. 9 महिने आणि 15 महिने वयोगटात या आजाराचे दोन डोस देण्यात येतात. त्याचबरोबर सेफ ड्रिकींग वॉटर, अजीवनसत्वाची मात्रा, सकस आहार, कुपोषण, कुपोषणावरील उपचार अशी उपाययोजना करून आपण ही साथ थांबवू शकतो.